शेजारी महिलेला पळवून घेऊन गेला मुलगा, मुलीकडील लोकांनी त्याच्या वडिलांवर केले अत्याचार आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 14:07 IST2023-03-14T14:07:17+5:302023-03-14T14:07:29+5:30
Crime News : अपमान सहन न झाल्याने वडिलांनी आत्महत्या केली. ही घटना 4 मार्चची आहे. पोलिसांनी आता 10 दिवसांनंतर याबाबत केस दाखल केली आहे.

शेजारी महिलेला पळवून घेऊन गेला मुलगा, मुलीकडील लोकांनी त्याच्या वडिलांवर केले अत्याचार आणि मग...
Crime News : मध्य प्रदेशच्या छतरपूरच्या एका गावातील मुलाच्या प्रेमाची शिक्षा त्याच्या वडिलांना चुकवावी लागली आहे. गावातील लोकांनी मुलाच्या वडिलांवर इतके अत्याचार केले की, त्याने आपला जीव दिला. मुलगा गावातील एका तरूणीला घेऊन पळाला होता. याचा सूड मुलीच्या परिवाराने मुलाच्या वडिलाच्या रूपात घेतला. अपमान सहन न झाल्याने वडिलांनी आत्महत्या केली. ही घटना 4 मार्चची आहे. पोलिसांनी आता 10 दिवसांनंतर याबाबत केस दाखल केली आहे.
छतरपूरच्या एका व्यक्तीला अशी शिक्षा देण्यात आली जी बघून कुणाच्याही अंगावर काटा येईल. इथे एका गावात राहणाऱ्या ऊधा अहिरवार नावाच्या व्यक्तीला साखळीने दोन दिवस एका झाडाला बांधून ठेवलं होतं. या व्यक्तीसोबत तालिबानी व्यवहार करण्यात आला. कारण त्याच्या मुलाने आपल्याच समाजातील एका मुलीला पळवून नेलं होतं.
मुलीकडील लोकांना जसं समजलं की, ऊंधा अहिरवारचा मुलगा त्यांच्या मुलीला पळवून घेऊन गेला तेव्हा त्याच्या घरी आले आणि त्याला जबरदस्ती पकडून आणलं. त्यानंतर त्याच्यावर अत्याचार केले. मुलीकडील लोकांनी ऊंधाला साखळीच्या मदतीने एका झाडाला बांधलं आणि सगळ्यांनी मिळून त्याला मारहाण केली. दोन दिवस तो त्या झाडाला बांधून होता.
जेव्हा सगळ्या गावात या घटनेची माहिती पोहोचली तेव्हा ऊंधाची मदत केली गेली. घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात ऊंधाची पत्नी साखळीने बांधलेल्या आपल्या पतीला जेवण देत आहे. दोन दिवसांनी ऊंधाला सोडण्यात आलं. पण मुलीकडील लोकांच्या अपमानाला कंटाळून ऊंधाने गळफास घेऊन आत्महत्या केली. 10 दिवसांनंतर पोलिसांनी पुरावे गोळा करत 6 लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.