chhatarpur rape case muslim boy rapes 2 minor girls on way to temple tension grips area | संतापजनक! मंदिरातून घरी परतणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार; परिसरात खळबळ

संतापजनक! मंदिरातून घरी परतणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार; परिसरात खळबळ

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. छतरपूर जिल्ह्यामध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे. दोन्ही मुली या मंदिरातून घरी परतत असताना ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित मुलींमध्ये पाच वर्षांच्या आणि अकरा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, छतरपूर जिल्ह्यातील प्रकाश ब्रह्मोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात ही घटना घडली आहे. गावातील दोन मुली अन्य मुलींसोबत मंदिरात गेल्या होत्या. मंदिरातून निघाल्यानंतर परिसरात एक तरूण त्यांच्याकडे गेला. त्यांना घरी सोडतो असं सांगून आपल्यासोबत घेऊन गेला. त्याच वेळी त्याने आजुबाजूला कोणीच नसल्याचा फायदा घेऊन मुलींवर बलात्कार केला. त्यानंतर दोन्ही मुलींनाही गावाच्या बाहेर सोडून तो पसार झाला. 

मुलींनी घडलेला हा सर्वप्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेचा माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. उत्तर प्रदेशच्या बदायूमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. भयंकर बाब म्हणजे यानंतर चिमुकलीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

विकृतीचा कळस! 5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार; गळा दाबून केली निर्घृण हत्या

एक चिमुकली आपल्या आईसोबत शेतात गेली होती. यावेळी 30 वर्षीय आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. तसेच गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली आहे. यानंतर काही स्थानिक लोकांनी आरोपीला घटनास्थळीच पकडलं आणि बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपी युवकाला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका गावातील 5 वर्षांची निष्पाप मुलगी आपल्या आईसोबत शेतात गेली होती. शेतात गेल्यानंतर ती आपल्या आईपासून काही अंतरावर गहू निवडत होती. यावेळी पीडित मुलीला एकटी पाहून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. 

English summary :
chhatarpur rape case muslim boy rapes 2 minor girls on way to temple tension grips area

Web Title: chhatarpur rape case muslim boy rapes 2 minor girls on way to temple tension grips area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.