शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

मालकाला मुलगा झाला सांगून मोफत साडीवाटपाच्या नावाखाली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 4:38 PM

२०१७ मध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.

ठळक मुद्देबाबू रमेश पवार (२२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.सध्या पसार असलेले साथीदार सुरेश आणि राजा यांच्यासोबत मिळून तो महिलांची फसवणूक करायचा.

मुंबई - मालकाला मुलगा झालाय. म्हणून मोफत साडीवाटप करत असल्याचे सांगून, महिलांची फसवणूक करणाऱ्या ठगाला बोरीवली पोलिसांनी अटक केली आहे. बाबू रमेश पवार (२२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पवार हा भांडुपचा राहणारा असून, त्याचे सध्या पसार असलेले साथीदार सुरेश आणि राजा यांच्यासोबत मिळून तो महिलांची फसवणूक करायचा. बोरीवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हा त्याच्या दोन साथीदारांसोबत रस्त्यात किंवा निर्जनस्थळी पायी जाणाऱ्या महिलांना गाठायचा. ‘माझ्या मालकाला मुलगा झाला, त्यामुळे त्यासाठी ते साडी वाटत आहेत,’ असे सांगत त्यांना साडी देऊ करायचा. त्या दरम्यान हात चलाखीने महिलेच्या अंगावरील दागिने घेऊन पसार व्हायचा. बोरीवलीमध्येही या टोळक्याने असा प्रकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, पोलीस त्याचा शोध घेत होते. तो बोरीवली परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोरे यांनी पथकासह पवारच्या मुसक्या आवळल्या. २०१७ मध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई