शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

फेसबुकद्वारे कमी किमतीत लॅपटॉप विक्रीचे आमिष दाखवून फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 10:00 PM

9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठळक मुद्देनीरजकुमार याला कल्याणच्या कोळसेवाडी भागातून 6 ऑक्टोबर रोजी अटक केली. त्याच्याकडून अशाच प्रकारच्या फसवणूकीचे आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठाणे - फेसबुक पेजवर अल्प दरात मोबाईल तसेच लॅपटॉप विक्रीचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या नीरजकुमार उर्फ देव जयकुमार दुबे (30, रा. काटेमानेवली, कल्याण, पूर्व) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.अंबरनाथ येथील रहिवाशी विजय चव्हाण हे ठाण्याच्या नौपाडयातील क्वेस्टा इन्स्टिटयूट, लोढे कंपाऊंड येथील क्लासेसमध्ये असतांना त्यांना फेसबुकवर पेजवर काग्रो प्रा. लि. या नावाने स्वस्त दरामध्ये मोबाइल आणि लॅपटॉप विक्रीचे अमिष दाखविण्यात आले. तसेच त्यांच्या मोबाईलचा व्हॉटसअ‍ॅप क्रमांक मिळवून त्यावरही एका भामटयाने नामांकित कंपनीच्या मोबाइलचे आणि लॅपटॉपचे फोटो पाठविले. त्यास चव्हाण यांनी संमती दाखविल्यानंतर त्यांच्याकडून 28 हजार रुपये आयएमपीद्वारे स्वीकारले. अर्थात, त्यांना त्या मोबदल्यात कोणताही मोबाइल किंवा लॅपटॉपही देण्यात आला नाही. मे ते सप्टेंबर 2019 या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये हा प्रकार घडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चव्हाण यांनी याप्रकरणी 30 सप्टेंबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले, पोलीस निरीक्षक रविंद्र क्षीरसागर, अविनाश सोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने नीरजकुमार याला कल्याणच्या कोळसेवाडी भागातून 6 ऑक्टोबर रोजी अटक केली. त्याच्याकडून अशाच प्रकारच्या फसवणूकीचे आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीArrestअटकthaneठाणेFacebookफेसबुकlaptopलॅपटॉपPoliceपोलिस