केळी व्यापाऱ्याची फसवणूक, माल घेऊन टाळाटाळ करून बुडवले ११ लाख 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 05:10 PM2020-07-23T17:10:34+5:302020-07-23T17:11:21+5:30

याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Cheating with Banana trader, took goods and drowned 11 lakhs | केळी व्यापाऱ्याची फसवणूक, माल घेऊन टाळाटाळ करून बुडवले ११ लाख 

केळी व्यापाऱ्याची फसवणूक, माल घेऊन टाळाटाळ करून बुडवले ११ लाख 

Next
ठळक मुद्देनेरी दिगर शेख रशीद हे परिसरातील शेतकऱ्यांकडून केळी विकत घेऊन बाहेर राज्यात विक्री करतात.

नेरी, ता. जामनेर  (जि. जळगाव) : येथील केळी व्यापारी शेख रशीद शेख बशीर यांची उत्तर प्रदेशातील दोन फ्रुट कंपनीच्या मालककांनी मिळून एकूण १० लाख ९२ हजार ४११ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  

वृत्त असे की,  नेरी दिगर शेख रशीद हे परिसरातील शेतकऱ्यांकडून केळी विकत घेऊन बाहेर राज्यात विक्री करतात. गेल्या १ जून रोजी रशीद यांनी उत्तर प्रदेशातील  नोएडा येथील साईफ्रुट कंपनी आणि एनएफसी फ्रुट कंपनी यांना सुमारे ११ लाख रुपयांचा केळी माल विकला होता. या मालाचे पैसे वेळेत न मिळाल्याने शेख रशीद यांनी कंपनीच्या मालकांकडे तगादा लावला. वेळोवेळी संपर्क साधून पैशांची मागणी केली, मात्र मालाचे पैसे देण्यास टाळाटाळ होत असून आपली फसवणूक केली जात असल्याचे लक्षात येताच साईफ्रुट कंपनीचे मालक कमलेश यादव आणि एनएफसी फ्रुट कंपनीचे सुंदर यादव या दोघा आरोपींविरोधात जामनेर पोलीस स्टेशनला शेख रशीद यांनी फिर्याद दिली.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

वकिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाही, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

 

...अन् फेसबुक फ्रेंडनं महिलेला घातला थोडा थोडका नव्हे, तर ११ लाखांचा गंडा

 

मनोरुग्ण तरुणीवर कारमध्ये अत्याचार; विवस्त्रवस्थेत आढळून आली पीडित तरुणी

 

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची नवीच शक्कल; हायकोर्टाकडून वकील देण्याची मागणी

 

विकास दुबेला जामीन कसा मिळाला हा मुख्य मुद्दा; सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला फटकारलं

 

कोर्टाचा दणका! राजा मान सिंग फेक चकमकप्रकरणी ११ पोलिसांनी जन्मठेपेची शिक्षा 

 

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या सोनू पंजाबनला कोर्टाने सुनावली २४ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

Web Title: Cheating with Banana trader, took goods and drowned 11 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.