कोर्टाचा दणका! राजा मान सिंग फेक चकमकप्रकरणी ११ पोलिसांनी जन्मठेपेची शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 08:33 PM2020-07-22T20:33:25+5:302020-07-22T20:34:53+5:30

न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राजा मान सिंगच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे. राज मान सिंगची मुलगी दीपा यांनी न्याय उशिराने मिळाला पण योग्य मिळाला असे सांगितले. 

11 policemen sentenced to life imprisonment in Raja Man singh fake encounter case | कोर्टाचा दणका! राजा मान सिंग फेक चकमकप्रकरणी ११ पोलिसांनी जन्मठेपेची शिक्षा 

कोर्टाचा दणका! राजा मान सिंग फेक चकमकप्रकरणी ११ पोलिसांनी जन्मठेपेची शिक्षा 

googlenewsNext
ठळक मुद्देन्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेनुसार भा. दं. वि. कलम १४८ अन्वये २ वर्षाचा तुरुंगवास आणि १ हजार रुपये दंड आणि कलम ३०२ आणि १४९ नुसार जन्मठेप, १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.राजा मान सिंग २१ फेब्रुवारी १९८५ साली पोलीस चकमकीत ठार झाला होता.

मथुरा - राजस्थान येथील भरतपूरच्या राजा मान सिंग याला ३५ वर्षापूर्वी फेक चकमकीत ठार केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी पार पडली. यामध्ये न्यायालयाने या प्रकरणातील सर्व दोषी ११ पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पोलीस चकमकीत राजा मानसिंगसह ३ जणांचा मृत्यू झाला होता. न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेनुसार भा. दं. वि. कलम १४८ अन्वये २ वर्षाचा तुरुंगवास आणि १ हजार रुपये दंड आणि कलम ३०२ आणि १४९ नुसार जन्मठेप, १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राजा मान सिंगच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे. राज मान सिंगची मुलगी दीपा यांनी न्याय उशिराने मिळाला पण योग्य मिळाला असे सांगितले. पोलीस कर्मचाऱ्यांच्यावतीने बाजू मांडणाऱ्या वकीलांनी सांगितले की, न्यायालयाच्या निर्णयानंतर उच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात आव्हान याचिका दाखल करणार आहे.


सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश साधना राणी ठाकूर यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात ११ पोलीस कर्मचारी भा. दं. वि. कलम १४८, १४९ आणि ३०२ नुसार दोषी आढळले होते. तत्कालीन सीओ कान सिंग भाटी, एसओ वीरेंद्र सिंग यांच्यासह ११ जणांचा समावेश होता. न्यायालयाने ३ पोलिसांची निर्दोष मुक्तता केली आहे. राजा मान सिंग २१ फेब्रुवारी १९८५ साली पोलीस चकमकीत ठार झाला होता. निवडणूक प्रचारासाठी राजा मान सिंग डीग भाजी मार्केटमध्ये असताना पोलीस चकमक झाली होती. या फेक चकमकप्रकरणी मुख्य आरोपी डीएसपी कान सिंग भाटी यांच्यासह १७ पोलिसांचा समावेश होता.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा

 

Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा

 

दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या 

 

वेदनादायी! शेतात घुसली म्हणून सांडणीचे कुऱ्हाडीनं कापले पाय; तडफडत सोडला जीव

 

वकिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाही, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

 

...अन् फेसबुक फ्रेंडनं महिलेला घातला थोडा थोडका नव्हे, तर ११ लाखांचा गंडा

 

मनोरुग्ण तरुणीवर कारमध्ये अत्याचार; विवस्त्रवस्थेत आढळून आली पीडित तरुणी

 

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची नवीच शक्कल; हायकोर्टाकडून वकील देण्याची मागणी

 

विकास दुबेला जामीन कसा मिळाला हा मुख्य मुद्दा; सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला फटकारलं

Web Title: 11 policemen sentenced to life imprisonment in Raja Man singh fake encounter case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.