प्रसिद्धीसाठी त्याने दिली सलमानला जीवे मारण्याची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 17:26 IST2019-10-03T17:17:23+5:302019-10-03T17:26:00+5:30

या प्रकरणी राजस्थान पोलिसांच्या चोपासणी पोलीस ठाण्याने दोघांना अटक केली आहे.

For cheap publicity accused threaten to salman khan to kill | प्रसिद्धीसाठी त्याने दिली सलमानला जीवे मारण्याची धमकी 

प्रसिद्धीसाठी त्याने दिली सलमानला जीवे मारण्याची धमकी 

ठळक मुद्दे गॅरी शूटर नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. लॉरेन्स बिष्णोईला सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवायची होती.

राजस्थान - बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला काही दिवसांपूर्वी गॅरी शूटर नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी राजस्थान पोलिसांच्या चोपासणी पोलीस ठाण्याने दोघांना अटक केली आहे.
पंजाबमधील कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याला गाडी चोरल्याच्या आरोपात अटक करण्यात आली होती. त्याचवेळी बिष्णोईने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आलं आहे. लॉरेन्स बिष्णोईला सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवायची होती. म्हणून सलमानला धमकी दिल्यावर तो प्रसिद्ध होता येईल म्हणून त्याने सलमानला जीवे मारण्याची खोटी धमकी दिली असा जबाब बिष्णोईने पोलिसांकडे दिला आहे.

Web Title: For cheap publicity accused threaten to salman khan to kill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.