वीस वर्षीय महिलेचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल; शिरूर येथील धक्कादायक घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 19:39 IST2020-08-10T19:37:02+5:302020-08-10T19:39:31+5:30
महिलेचा विनयभंग करून तिच्याकडून शारीरिक सुखाची केली होती मागणी..

वीस वर्षीय महिलेचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल; शिरूर येथील धक्कादायक घटना
न्हावरे : न्हावरे (ता.शिरूर) येथे वीस वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिच्याबरोबर लैंगिक सुखाची इच्छा व्यक्त करणाऱ्या डॉक्टरवर शिरूर पोलिसांनी संबंधित महिलेच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्याच्या घटनेत न्हावरे येथील डॉ. रामहरी भुजंगराव लाड (रा.न्हावरे ता.शिरूर ) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेऊन अटक केले होते. दरम्यान, सोमवारी शिरूर न्यायालयात डॉ. लाड यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
या घटनेसंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्रापूर येथील वीस वर्षीय महिला काल (दि.९)पोटात दुखत असल्याने डॉ. लाड यांच्या नाथकृपा हाँस्पिटलमध्ये गेली असता डॉ. लाड यांनी तिच्याबरोबर मनात लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील वर्तन करुन तिच्याबरोबर लैंगिक सुखाची इच्छा व्यक्त केली . यासंदर्भात संबंधित महिलेने आपल्या नातेवाईकांना कळविले . दरम्यान या घटनेची तक्रार संबधित महिलेने आज (दि १० ) शिरूर पोलिस ठाण्यात दाखल केलीअसता . संबंधित महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी डॉ. रामहरी लाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोटे करत आहेत.