शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
2
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
3
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
4
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
5
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
6
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
7
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
8
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
9
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
10
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
11
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
12
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
13
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
14
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
15
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
16
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
17
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
18
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
19
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
20
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 22:28 IST

याप्रकरणी शहर पोलिसांनी नराधम शिक्षकावर पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. दिलीप दादाजी मडावी (५३) असे अटकेतील नराधम शिक्षकाचे नाव आहे.

चंद्रपूर : नाशिकमधील मालेगाव येथे तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना गाजत असतानाच चंद्रपुरातही एका अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली. याप्रकरणी शहर पोलिसांनी नराधम शिक्षकावर पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. दिलीप दादाजी मडावी (५३) असे अटकेतील नराधम शिक्षकाचे नाव आहे.

पीडित मुलगी राजुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत मागील पाच वर्षांपूर्वी इयत्ता सहावीत शिकत होती. शिक्षकसुद्धा तिथेच कार्यरत होता. पीडित मुलगी हुशार असल्याने तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च प्राथमिक शिक्षणासाठी चंद्रपूरला पाठवण्याचा सल्ला मडावीने तिच्या आई-वडिलांना दिला. त्यामुळे मागील वर्षी ती मुलगी चंद्रपूर येथे शिक्षणासाठी आली. दरम्यान, त्या मुलीचे आई-वडील काही आवश्यक साहित्य त्या शिक्षकाकडे पाठवायचे. तेव्हा शिक्षक तिच्या रुमखाली जाऊन त्या मुलीला घरगुती सामान देण्याच्या बहाण्याने आपल्या गाडीत बसवून तिचे शोषण करायचा. मात्र, बदनामीच्या भीतीने त्या मुलीने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. २० तारखेला ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनात पीएसआय तृप्ती खंडाईत यांनी पीडित मुलीचे बयान घेत शिक्षक दिलीप मडावी याच्यावर बीएनएस (७५ (१), ६४ (२), आयएमएफ ६५ १, ३५२, ४, ६, १२ पॉक्सो ६६ (ई) ६७ (ए) आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके करत आहेत.

...असे आले प्रकरण उघडकीस -नराधम शिक्षक पीडित मुलीला रात्री बाथरुममध्ये जाऊन विवस्त्र होऊन व्हिडीओ कॉल करायला सांगायचा. या कॉलचे त्याने स्क्रिनशॉटसुद्धा काढले होते. २० नोव्हेंबर २०२५ रोजी चुकीने हा स्क्रिनशॉट व चॅटिंग पीडित मुलीच्या वडिलांच्या मोबाइलवर जाताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी मुलीला याबाबत विचारणा केली, तिने आपबिती कथन केली. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.घुग्घुस केंद्रातही तक्रार -दिलीप मडावी याची मागील काही दिवसांपूर्वी घुग्घुस केंद्रातील एका शाळेत बदली झाली. येथेही त्याने मुलींना बॅडटच केल्याच्या तक्रारी पालकांकडे गेल्या. त्यांनी शाळा गाठून त्या शिक्षकाला चांगलेच धारेवर धरले. पोलिस ठाण्यापर्यंतही विषय गेला होता. मात्र, तक्रार झाली नसल्याची माहिती आहे. शेवटी पालकांनी त्या शिक्षकाची बदली करण्याची मागणी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur Shaken Again: Minor Girl Assaulted, Teacher Arrested

Web Summary : Chandrapur: A teacher was arrested for sexually assaulting a minor girl. The accused, Dilip Madavi, exploited the girl, a former student, under the guise of helping her with her education. He has been charged under the POCSO Act after the family discovered incriminating screenshots.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षकPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषण