शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 08:30 IST

Chaitanyananda Saraswati : दिल्ली येथील एका संस्थेत  स्वयंघोषित बाबा चैतन्यनंदने अनेक विद्यार्थिनींचा छळ केला.

दिल्ली येथील एका संस्थेत  स्वयंघोषित बाबा चैतन्यनंदने अनेक विद्यार्थिनींचा छळ केला. मुलींचे मोबाईल आणि प्रमाणपत्र स्वतःकडे ठेवून तो त्यांचं आयुष्य कंट्रोल करत होता. मुलींना त्याच्या आदेशाचं पालन करण्यास भाग पाडलं होतं. त्यांना गुलाम बनवून ठेवलं असल्याच खळबळजनक दावा पीडित मुलींपैकी एकीच्या मैत्रिणीने केला आहे.

संस्थेत शिक्षण घेणाऱ्या एका मुलीने सांगितलं की, "तो (चैतन्यनंद) आधी विद्यार्थिनी निवडायचा, त्यांना त्यांचे फोन जमा करण्यास सांगायचा जेणेकरून त्या 'त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील.' फोन काही काळासाठी त्याच्याकडेच असायचे आणि त्या बदल्यात तो मुलींना त्याच्या पसंतीचा एक नवीन फोन द्यायचा. यामुळे त्यांच्यामध्ये होणाऱ्या संवादावर नियंत्रण राहायचं आणि ते इतरांपर्यंत पोहचायचं नाही."

"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ

विद्यार्थिनीचं करिअर धोक्यात

"एकदा प्रवेश मिळाल्यावर नियमांनुसार मुलींना सर्व मूळ कागदपत्र आणि प्रमाणपत्र सादर करावी लागायची, जी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरच परत केली जात होती. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, कारण प्रत्येक विद्यार्थिनीचं करिअर धोक्यात आलं होतं. जर कोणी निषेध करण्याचे किंवा तक्रार करण्याचे धाडस केले तर त्यांना भीती होती की त्यांची कागदपत्र त्यांना कधीही परत मिळणार नाही, ज्यामुळे त्यांचं करिअर उद्ध्वस्त होईल."

नापास करण्याची धमकी 

विद्यार्थिनींनी चैतन्यनंद किंवा त्याच्या जवळच्या सहकाऱ्यांचं म्हणणं न मानल्यास त्यांना नापास करण्याची किंवा हद्दपार करण्याची धमकी देण्यात आली होती. "मुलींना अनेकदा इशारा देण्यात आला होता की जर त्यांनी त्याचा विरोध केला तर त्यांचं करिअर उद्ध्वस्त होईल. काहींना तर संस्थेतून काढून टाकण्यात आलं. शेवटी, कोणीतरी बोलण्याचे धाडस केलं" असंही सांगितलं आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Chaitanyanand's dark deeds: How he enslaved girls, shocking revelations.

Web Summary : Self-proclaimed Baba Chaitanyanand in Delhi allegedly exploited female students. He controlled their lives by seizing phones and certificates, forcing obedience under threat of ruined careers and expulsion, revealed by a victim's friend.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिसStudentविद्यार्थीMolestationविनयभंग