Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 17:18 IST2025-10-02T17:17:03+5:302025-10-02T17:18:27+5:30
Chaitanyananda Saraswati : विद्यार्थिनींनी स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे समोर आणले. तो मुलींना खूप त्रास देत होता.

Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
स्वयंघोषित बाबा चैतन्यनंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी याचा खरा चेहरा आता उघड झाला आहे. त्याच्या मठातून सेक्स टॉय आणि अश्लील सीडी सापडली. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू करण्यात आली. पोलिसांनी तीन मोबाईलमधून शेकडो परदेशी नंबर जप्त केले आहेत आणि बाबाचा एका मोठ्या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे.
विद्यार्थिनींनी स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे समोर आणले. तो मुलींना खूप त्रास देत होता. लैंगिक संबंधांसाठी दबाव आणत असे आणि त्यांना धमकावत असे. ३५ हून अधिक मुलींचा त्याने छळ केला. चैतन्यनंदला सेक्स टॉय आणि अश्लील सीडी नेमक्या कोणी पुरवल्या आणि मठात खरोखरच एक मोठं रॅकेट कार्यरत होतं का? याचा तपास पोलीस आता करत आहेत.
अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
पोलीस बाबाच्या मानसिक स्थितीचाही तपास करत आहेत. त्याच्या तीन मोबाईलवर शेकडो परदेशी नंबर सापडले आहेत. दिल्ली ते दुबईपर्यंत त्याचं नेटवर्क पसरलं आहे. दुबईतील शेखशी असलेले स्वयंघोषित बाबाचे संबंध तपासत आहेत. अटक करण्यात आलेला चैतन्यनंद पोलिसांना सहकार्य करत नसल्याचं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. दिल्ली पोलीस चैतन्यनंदला घेऊन संस्थेत पोहोचले. त्याच्यासोबत त्याच्या महिला साथीदाराचीही चौकशी केली जाईल.
चैतन्यनंदच्या मोबाईलवर अनेक मुलींशी अश्लील चॅट्स आढळल्यानंतर तपास अधिक तीव्र झाला आहे. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, स्वयंघोषित बाबाने त्यांच्या अय्याशीसाठी संस्थेत एक आलिशान, लग्झरी रुम बांधली होती. चॅटमध्ये तो दुबईच्या शेखसाठी पार्टनर शोधण्याबद्दल बोलत होता. आता, पोलीस चैतन्यनंदसमोर संस्थेतील काही लोकांचे जबाब नोंदवू शकतात.