JEE परीक्षेत झालेल्या घोटाळाच्या तक्रारीवरुन CBI ॲक्शन मोडवर; देशात २० ठिकाणी धाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 22:07 IST2021-09-02T22:05:01+5:302021-09-02T22:07:55+5:30
JEE exam fraud complaint: सीबीआयची टीम दिल्ली-एनसीआर, पुणे, जमशेदपूरसह अनेक शहरांमध्ये पोहोचली आणि संस्थेशी संबंधित ठिकाणे शोधत आहेत.

JEE परीक्षेत झालेल्या घोटाळाच्या तक्रारीवरुन CBI ॲक्शन मोडवर; देशात २० ठिकाणी धाडी
नवी दिल्ली - बारावीनंतर तंत्रशिक्षणात पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणयासाठी JEE mains ही परीक्षा द्यावी लागते. देशभरात चालू असलेल्या जेईई (मेन्स) परीक्षेत 2021 मध्ये घोटाळा झाल्याच्या तक्रारीनंतर सीबीआयने गुरुवारी देशातील 20 ठिकाणी छापे टाकले. एका खासगी शैक्षणिक संस्थेच्या ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आले. या दरम्यान, सीबीआयची टीम दिल्ली-एनसीआर, पुणे, जमशेदपूरसह अनेक शहरांमध्ये पोहोचली आणि संस्थेशी संबंधित ठिकाणे शोधत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने 1 सप्टेंबर रोजी खासगी शिक्षण संस्था चालवणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला होता. या कंपनीचे संचालक, 3 कर्मचारी आणि इतर अनेकांविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला. असा आरोप आहे की या लोकांनी देशात चालू असलेल्या JEE (मेन्स) परीक्षेत 2021 मध्ये अनियमितता आढळून आली आहे. याची चौकशी करत CBI नं आज छापेमारी करत तब्बल 7 जणांना ताब्यात घेतलं आहे.
वसईतील भुईगाव समुद्रात संशयित बोट आढळली; पोलिसांसह नौदल सतर्क, तपास सुरुhttps://t.co/77BSc7M1KV
— Lokmat (@MiLOKMAT) September 2, 2021
या शिक्षण संस्थेचे कर्मचारी आणि केंद्र सहकारी हे या परीक्षेमध्ये अनियमितता आणण्यासाठी मदत करत होते. या प्रकरणात एक कंपनी, संचालक आणि तीन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणाचा पुढील तपस पोलीस करत आहेत.