शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

चोरीचा माल घेतल्याचा आरोप करुन लाच घेणाऱ्या हवालादारासह दोघांना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 3:30 PM

तक्रारदार यांचा हडपसर येथील आनंदनगरमध्ये भंगाराचा व्यवसाय आहे़.

ठळक मुद्देमहिलेची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे २४ एप्रिलला तक्रार

पुणे : चोरीचा माल खरेदी करत असल्याचा आरोप करत कारवाई न करण्यासाठी भंगार व्यावसायिकाकडून ५ हजार रुपयांची लाच घेताना खासगी व्यक्तीसह पोलीस हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़. पोलीस हवालदार निसार मेहमुद खान (वय ४४) आणि मेहंदी अजगर शेख (वय ३२, रा़ हडपसर) अशी पकडलेल्या दोघांची नावे आहेत़. याप्रकरणी एका ४५ वर्षांच्या महिलेने तक्रार दिली होती़. तक्रारदार यांचा हडपसर येथील आनंदनगरमध्ये भंगाराचा व्यवसाय आहे़. पोलीस हवालदार निसार खान याने त्यांच्यावर चोरीचा माल खरेदी करीत असल्याचा आरोप करुन तशा तक्रारी आल्या आहेत, असे सांगितले़. त्यामध्ये कारवाई करायची नसेल व भंगाराचा धंदा पुढे चालू ठेवायचा असेल तर १५ हजार रुपयांची मागणी केली़ .तेव्हा या महिलेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे २४ एप्रिलला तक्रार केली़. तक्रारीची पडताळणी करताना हवालदार खान याने ५ हजार रुपये स्वीकारण्याची तडजोड केली़. त्यानुसार गुरुवारी दुपारी हडपसर येथील ताज फर्निचरजवळ सापळा रचण्यात आला़. खान याच्या सांगण्यावरुन मेहंदी शेख याला पकडण्यात आले़. त्यानंतर खान यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे़. पोलीस उपअधीक्षक वर्षाराणी पाटील, पोलीस निरीक्षक राजू चव्हाण, चंद्रकांत चौधरी,सहायक पोलीस उपनिरीक्षक ढवणे, हवालदार शेळके, पोलीस नाईक झगडे, चालक वाळके यांनी या कारवाईत भाग घेतला़. 

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCorruptionभ्रष्टाचार