Case registered against Ajit Pawar's close leader; used abusive words to engineer women pda | अजित पवारांच्या जवळच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, इंजिनीअर महिलेस केली अश्लील शिवीगाळ

अजित पवारांच्या जवळच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, इंजिनीअर महिलेस केली अश्लील शिवीगाळ

ठळक मुद्देमहापालिकेतील कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या २५ वर्षीय महिलेस अश्लील शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप मी आजवर ४० - ५० गुन्हे केले आहेत. तू माझं काहीही बिघडवू शकत नाहीस, अशी धमकी दिली

पिंपरी चिंचवड  - पिंपरी चिंचवड महापालिकेतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या नगरसेवक जावेद शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारण महापालिकेतील कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या २५ वर्षीय महिलेस अश्लील शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप नगरसेवक जावेद शेख यांच्यावर महिलेने केला आहे. शेख यांच्याविरुद्ध अभियंता असलेल्या महिलेने पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी आकुर्डी येथे घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख यांनी या महिलेस आकुर्डी येथील आपल्या कार्यालयात बोलावून घेतले आणि साईटवर आल्याशिवाय एकही वीट हल्ली तर मी बघून घेईन अशी धमकी देत त्यांच्या भागातील विकास कामाचा पाठपुरावा मी करायचा आणि दुसरे नगरसेवक क्रेडिट कसे घेऊन जातात अशी तंबी देखील शेख यांनी त्या महिला अभियंत्याला दिली. 

मी आजवर ४० - ५० गुन्हे केले आहेत. तू माझं काहीही बिघडवू शकत नाहीस, अशी धमकी देत इंजिनिअर महिला कर्मचाऱ्यास जावेद शेख यांनी अश्लील भाषा वापरून तंबी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर महिलेच्या तक्रारीनुसार विनयभंग आणि धमकीचा गुन्हा निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निगडी पोलीस तपास करत आहेत. 

Web Title: Case registered against Ajit Pawar's close leader; used abusive words to engineer women pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.