Carrying the body on his shoulder, he reached a distance of 2 km and surrendered the ex-serviceman before police | मृतदेह खांद्यावर घेऊन गाठले २ किमी अंतर अन् माजी सैनिक पोलिसांसमोर झाला सरेंडर 

मृतदेह खांद्यावर घेऊन गाठले २ किमी अंतर अन् माजी सैनिक पोलिसांसमोर झाला सरेंडर 

ठळक मुद्देमृतदेह खांद्यावर उचलून २ किलोमीटर पायी चालत त्याने पोलीस ठाणं गाठलं आणि स्वतःला सरेंडर केलं.बलरामपूर जिल्ह्यातील वाड्रफनगर विकासखंड येथे  एका घटनेने सर्वसामान्य नागरिकांना हैराण केले.

मद्यधुंद माजी सैनिकाने एका व्यक्तीला त्याच्या कारने जोरदार धडक दिली आणि धडकेत त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर, मृतदेह खांद्यावर उचलून २ किलोमीटर पायी चालत त्याने पोलीस ठाणं गाठलं आणि स्वतःला सरेंडर केलं.

बलरामपूर जिल्ह्यातील वाड्रफनगर विकासखंड येथे  एका घटनेने सर्वसामान्य नागरिकांना हैराण केले. माजी सैनिकाच्या कारच्या जोरदार धडकेने एकाच मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह खांद्यावर घेऊन २ किलोमीटर चालत पोलीस ठाण्यात घेऊन गेला. माजी सैनिकाने आलेल्या रुग्णवाहिकेला देखील मृतदेहाला हात लावू दिला नाही. गुरुवारी संध्याकाळी चारच्या सुमारास माजी सैनिक लालमन मरावी यांनी पायी चालत जाणार्‍या एका युवकाला आपल्या कारने जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर लोकांनी १०८ क्रमांकावर कॉल करून रुग्णवाहिका बोलवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मृत तरुणाला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बसंतपूर टीआय राजकुमार लेहरे म्हणाले की, एका व्यक्तीला कारने धडक दिली. दरम्यान, काही लोकांनी रुग्णवाहिका कॉल केला, पण माजी सैनिकाने आपल्या खांद्यावरून मृतदेह घेऊन २ किलोमीटर दूर पायी चालत पोलीस ठाण्यात पोहचला.

Web Title: Carrying the body on his shoulder, he reached a distance of 2 km and surrendered the ex-serviceman before police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.