भरधाव कारने चिरडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 23:40 IST2019-05-24T23:38:40+5:302019-05-24T23:40:28+5:30
वसईमध्ये राहणारा महेंद्र कुमार रामेश्वर यादव (21) असे त्या तरुणाचे नाव आहे.

भरधाव कारने चिरडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
नालासोपारा - मुंबई अहमदाबाद महामार्गावर रस्ता क्रॉस करताना 21 वर्षीय तरुणाला भरधाव वेगातील अनोळखी कारने चिरडल्याची घटना घडली आहे. वसईमध्ये राहणारा महेंद्र कुमार रामेश्वर यादव (21) असे त्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास महेंद्र रस्ता क्रॉस करत असताना गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगातील होंडा सिटी कारने त्याला चिरडले. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्यानंतर अनोळखी कार चालक कार घेऊन पळाला आहे. वालीव पोलिसांनी फरार कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.