Car Accident due to Water Bottle: कारमध्ये ठेवलेली पाण्याची बाटली काळ ठरली; इंजिनिअरचा अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 22:26 IST2021-12-05T22:21:29+5:302021-12-05T22:26:04+5:30
Car Accident: दिल्लीमध्ये राहणारा इंजिनिअर अभिषेक झा आपल्या मित्रासोबत ग्रेटर नोएडाच्या दिशेने जात होता.

Car Accident due to Water Bottle: कारमध्ये ठेवलेली पाण्याची बाटली काळ ठरली; इंजिनिअरचा अपघातात मृत्यू
एक छोटीशी चूक कधी कधी जिवावर बेतते. असाच प्रकार नोएडा-ग्रेटर नोएडाच्या एक्स्प्रेस वेवर घडला आहे. कारमध्ये ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीमुळे इंजिनिअरला जीव गमवावा लागला आहे.
दिल्लीमध्ये राहणारा इंजिनिअर अभिषेक झा आपल्या मित्रासोबत ग्रेटर नोएडाच्या दिशेने जात होता. यावेळी त्यांची कार रस्त्याशेजारी थांबलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर मित्र गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी अपघाताचे कारण गाडीतील पाण्याची बॉटल असल्याचे म्हटले आहे.
पोलिसांनी सांगितले की, अभिषेक कार चालवत होते. यावेळी सीटच्या मागे ठेवलेली पाण्याची बॉटल सरकत अभिषेकच्या पायाखाली आली. ट्रक जवळ आल्याने त्याने कार थांबविण्यासाठी ब्रेक लावला, मात्र, ब्रेक पॅडलच्या खाली पाण्याची बॉटल आल्याने ब्रेक अडकला आणि कार ट्रकवर जाऊन आदळली. अभिषेक झा ग्रेटर नोएडाच्या एका कंपनीमध्ये नोकरीला होता.
अभिषेकची कार होती. ते दोघेही नोएडाहून ग्रेटर नोएडाला जाण्यासाठी निघाले होते. सेक्टर 144 जवळ एक ट्रक बिघडल्याने रस्त्याच्या कडेला उभा होता. मात्र, ब्रेक न लागल्याने कार ट्रकवर आदळल्याचे पोलिसांनी सांगितले.