अल्पवयीन प्रेयसीला नोट्स देण्यासाठी घरी बोलावले; काकासोबत मिळून केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 18:17 IST2020-06-15T18:16:12+5:302020-06-15T18:17:46+5:30

तिने १७ वर्षीय  विद्यार्थ्याशी मैत्री केल्यानंतर  त्या विद्यार्थ्याने तिची आपल्या काकाशी ओळख करून दिली. त्यानंतर त्या नराधम काकाने विद्यार्थ्यासह अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला आहे.

Called home to give notes to minor GF; Rape with uncle | अल्पवयीन प्रेयसीला नोट्स देण्यासाठी घरी बोलावले; काकासोबत मिळून केला बलात्कार

अल्पवयीन प्रेयसीला नोट्स देण्यासाठी घरी बोलावले; काकासोबत मिळून केला बलात्कार

ठळक मुद्देविद्यार्थिनीचे म्हणणे आहे की, जेव्हा तिने विरोध केला तेव्हा मित्राच्या काकाने मारहाण केली आणि मृतदेह झाडीत फेकण्याची धमकी दिली.याप्रकरणी पोलिसांनी महिला पोलिस ठाण्याच्या मदतीने या विद्यार्थिनीवर वैद्यकीय उपचार केले आहेत.वैद्यकीय तपासणीनंतर सोमवारी हा अहवाल अपेक्षित असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याच वेळी पीडित विद्यार्थिनीचे कोर्टात भा. दं. वि. कलम १६४ अंतर्गत जबाब नोंदविण्यात 

पाटणा - बिहारची राजधानी असलेल्या पाटणामध्ये पुन्हा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यासह त्याच्या काकाने 13 वर्षीय विद्यार्थिनीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. ही घटना शहरातील राजीव नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील असून ही विद्यार्थिनी इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत आहे. तिने १७ वर्षीय विद्यार्थ्याशी मैत्री केल्यानंतर त्या विद्यार्थ्याने तीची आपल्या काकाशी ओळख करून दिली. त्यानंतर त्या नराधम काकाने विद्यार्थ्यासह विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीवर तिच्या शाळेतील विद्यार्थी आणि काकाने  बलात्कार केल्याची घटना घडली. पुनपुन भागात ही सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. पोलिसांनी असे सांगितले आहे की, २ जून रोजी विद्यार्थी असलेल्या मुलाने शाळकरी मुलीला नोट्स देण्याच्या बहाण्याने घरी भेटायला बोलावले. त्यानंतर फिरण्याच्या बहाण्याने पुनपुन येथील काकाच्या घरी तिला घेऊन गेला. पीडित मुलीचे म्हणणे आहे की, तिला तेथेच जबरदस्तीने थांबविण्यात आले आहे आणि आधी तिच्या मित्राने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर त्याच्या काकानेही माझ्यावर बलात्कार केला. दोघेही एकाच रात्री एकाच खोलीत होते.

याशिवाय आरोपी विद्यार्थ्याचा काकादेखील त्याच खोलीत होता. यानंतर आरोपीच्या काकाने तिला धमकावून झुडूपात घराबाहेर नेले आणि तेथे देखील तिच्यावर बलात्कार केला. पीडित विद्यार्थिनीचे म्हणणे आहे की, जेव्हा तिने विरोध केला तेव्हा मित्राच्या काकाने मारहाण केली आणि मृतदेह झाडीत फेकण्याची धमकी दिली.

सामूहिक बलात्कारानंतर प्रियकर असलेल्या विद्यार्थ्याच्या काकाने मुलीच्या कुटुंबियांना कॉल करून बोलावून सांगितले की, इथे तुमची मुलगी आहे, तिला घेऊन जा. कुटुंबीय पुनपुन येथे गेले आणि विद्यार्थिनीला पाटणा येथे आणले. भीतीमुळे मुलगी आपल्यासोबत काय घडले हे कुटुंबीयांना सांगत नव्हती. तिची तब्येतही खालावली. काही दिवसांनंतर तिने घरातल्यांना सांगितले की, प्रियकर आणि त्याच्या काकाने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

यानंतर राजीवनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल गेला आहे. पोलिसांनी माहिती दिली की, ती मुलगी आपल्या मित्रासोबत स्वतःहून गेली होती. मात्र, मित्राने फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केला. आरोपी विद्यार्थी आणि त्याच्या काकाच्या शोधात पोलिस छापा टाकत आहेत. आरोपी विद्यार्थी दानापूरचा रहिवासी आहे. दोघेही शाळेत मित्र होते. पोलिसांनी आरोपीच्या कुटूंबाची चौकशी केली आहे. पुनपुनमधील घटनेच्या ठिकाणीही पोलिसांनी तपासणी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिला पोलिस ठाण्याच्या मदतीने या विद्यार्थिनीवर वैद्यकीय उपचार केले आहेत. वैद्यकीय तपासणीनंतर सोमवारी हा अहवाल येेणं अपेक्षित असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याच वेळी पीडित विद्यार्थिनीचे कोर्टात भा. दं. वि. कलम १६४ अंतर्गत जबाब नोंदविण्यात येईल.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Coronavirus : बापरे! रुग्णालयातून संभाव्य कोरोना रुग्ण झाला बेपत्ता, कुटुंबीयांनी केली पोलिसात तक्रार

 

पाकचा बुरखा फाडला! ‘हनीट्रॅप’ करणारी ती' हाफिज सईदच्या होती संपर्कात

 

बोहल्यावर चढलेल्या कट्टर नक्षलवादी महिलेस अटक, दोन्ही हाताने चालवते AK-47

 

अधुरी प्रेम कहानी! GF ला भेटण्यासाठी मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला डॉक्टर; जिवाला मुकला

 

अनर्थ टळला! दादरमध्ये सुरु होता ४ तास थरार, इमारतीवर चढून पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

 

नगरसेवकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; झोपायला जातो सांगून गेला, अन्...

Web Title: Called home to give notes to minor GF; Rape with uncle