कॅबचालकाकडून आयटी अभियंता तरुणीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 14:35 IST2019-01-03T14:34:51+5:302019-01-03T14:35:24+5:30
शेअरिंग कॅबमधुन प्रवास करणाऱ्या आयटी अभियंता तरूणीचा ती एकटीच असल्याच्या संधीचा फायदा उठवत कॅबचालकाने विनयभंग केला.

कॅबचालकाकडून आयटी अभियंता तरुणीचा विनयभंग
पिंपरी : राधा चौक ते म्हाळुंगे गाव दरम्यान शेअरिंग कॅबमधुन प्रवास करणाऱ्या आयटी अभियंता तरूणीचा ती एकटीच असल्याच्या संधीचा फायदा उठवत कॅबचालकाने विनयभंग केला. ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव संतोष चंद्रकांत शेटे (वय ३९,रा. पर्वती, दत्तवाडी) असे आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय तरुणीने आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. १ जानेवारीला तरुणी एकटीच शेअरिंग कॅबने प्रवास करत होती. (एमएच १२, के एन ५९३७) या वाहनावरील चालकाने तरुणीशी अश्लील श्ब्दरात संभाषण केले. तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तरूणीने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.