हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ५ तरुणींची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 17:55 IST2019-08-09T17:43:03+5:302019-08-09T17:55:46+5:30

वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून एलसीबी तपास करत आहे. 

Busted high profile sex racket; 5 girls rescued | हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ५ तरुणींची सुटका

हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ५ तरुणींची सुटका

ठळक मुद्दे 5 पीडित तरुणींची सुटका केली असून हे चालवणारे तिघांना अटक केली आहे. पवई येथे राहणारा दीपक वाल्मिकी (३०) यालाही अटक केली आहे.  

नालासोपारा - मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील एका मोठ्या हॉटेलच्या रूममध्ये डान्स ग्रुपच्या नावाखाली हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती एलसीबीला मिळाल्यावर सदर ठिकाणी बनावट 4 ग्राहक पाठवून त्यांनी सिग्नल दिल्यावर धाड टाकून 5 पीडित तरुणींची सुटका केली असून हे चालवणारे तिघांना अटक केली आहे. वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून एलसीबी तपास करत आहे. 

मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील वसई फाटा येथील रुद्रा इंटरनॅशनल शेल्टर हॉटेलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षका सिद्धवा जायभाये आणि वसई युनिटच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. मुंबई, मिरा भाईंदर येथे राहणाऱ्या 25 ते 30 वयोगटातील पाच पीडित तरुणींची सुटका केली असून डान्स ग्रुपचे आयोजन करणारे व ग्राहकांना बोलावणारे मालाडला राहणारा शेहनवाज रेहमान खान (40), जोगेश्वरीला राहणारा साजिद इकबाल खान (३९) या दोन एजंटला पकडले असून हॉटेलमध्ये डान्ससाठी रूममध्ये डीजे, साऊंड सिस्टीम, लाईट सिस्टीम, कम्प्युटर याची सुविधा करणारा आणि हॉटेलमध्ये रूम बुक करणाऱ्या पवई येथे राहणारा दीपक वाल्मिकी (३०) यालाही अटक केली आहे.  

Web Title: Busted high profile sex racket; 5 girls rescued