धायरीत मंडप व्यावसायिकाची गळफास घेत आत्महत्या, नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 12:43 IST2020-06-19T11:10:38+5:302020-06-19T12:43:31+5:30
मानसिक ताणतणावाखाली असल्याचा अंदाज

धायरीत मंडप व्यावसायिकाची गळफास घेत आत्महत्या, नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल
धायरी: सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात एका व्यावसायिकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर प्रकार आज शुक्रवार (दि.१९) रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास उघडीस आला.
स्वप्निल उत्तम रायकर( ४५ वर्षे, रा. शिव मल्हार नगर, रायकर मळा, धायरी, ता. हवेली जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील यांचा मंडप डेकोरेटरचा व्यवसाय आहे. त्यांनी राहत्या घरी किचन रूम मध्ये छताच्या हुकला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर घटना पहाटे २ ते सहा वाजण्याच्या सुमारास घडली असून पहाटे सहा वाजता स्वप्नीलची आई झोपेतून उठल्यानंतर किचन मध्ये आल्यानंतर सदर प्रकार उघडीस आला. मानसिक ताण- तणावातून त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रुस्तम शेख हे करीत आहेत.