भाजपा नेत्याची गुंडगिरी, चक्क अंध व्यक्तीलाच केली जबर मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 17:21 IST2018-12-26T17:19:50+5:302018-12-26T17:21:03+5:30

उत्तर प्रदेशातील सांभाल येथील ही घटना आहे. मोहम्मद मिया असे मारहाण करणाऱ्या भाजपा नेत्याचे नाव आहे.  

The bully of the BJP leader, the blind person has been assaulted | भाजपा नेत्याची गुंडगिरी, चक्क अंध व्यक्तीलाच केली जबर मारहाण

भाजपा नेत्याची गुंडगिरी, चक्क अंध व्यक्तीलाच केली जबर मारहाण

ठळक मुद्देअंध व्यक्तीला भाजपा नेत्याकडून चक्क काठीने मारहाण करण्यात आली भाजपा नेत्याची गुंडगिरी दिसून आली आहे. उत्तर प्रदेशातील सांभाल येथील ही घटना आहे. मोहम्मद मिया असे मारहाण करणाऱ्या भाजपा नेत्याचे नाव आहे.  

लखनऊ - भाजपाविरोधात घोषणा दिल्या आणि अखिलेश यादवांना मत देणार म्हटल्याने अंध व्यक्तीला भाजपा नेत्याकडून चक्क काठीने मारहाण करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार घडला असून भाजपा नेत्याची गुंडगिरी दिसून आली आहे. आपण समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना मत देणार असल्याचे म्हणत अंश व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली. नंतर हा मारहाणीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. उत्तर प्रदेशातील सांभाल येथील ही घटना आहे. मोहम्मद मिया असे मारहाण करणाऱ्या भाजपा नेत्याचे नाव आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मिया एका अंध व्यक्तीच्या चेहऱ्यावर काठीने मारहाण करत असल्याचे दिसून येते. 



 

Web Title: The bully of the BJP leader, the blind person has been assaulted