बांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 16:31 IST2019-01-16T16:26:27+5:302019-01-16T16:31:03+5:30
वेळेत काम पूर्ण न झाल्याने आधीच अगरवाल तणावाखाली होते. त्यात या फ्लॅट खरेदीदारांनी त्यांचे पैसे परत करण्याची मागणी केल्याने त्रस्त होऊन त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असा आरोप आहे.

बांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
मुंबई - चेंबूर येथील संजय अग्रवाल नावाच्या बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केली होती. या घटनेला अंदाजे 10 दिवस झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी 6 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे सहाजण फ्लॅट खरेदीदार असल्याचं कळत आहे. वेळेत काम पूर्ण न झाल्याने आधीच अगरवाल तणावाखाली होते. त्यात या फ्लॅट खरेदीदारांनी त्यांचे पैसे परत करण्याची मागणी केल्याने त्रस्त होऊन त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असा आरोप आहे.
अग्रवाल यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल पोलिसांनी सहा जणांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहे. यामध्ये संजय वोरा, जितेंद्र जैन, कल्पेश ठक्कर, सचिन ढोलकिया, राज विलास गडकरी आणि किशोर शहा यांचा समावेश आहे. संजय अग्रवाल यांचा मुलगा क्षितीजने दाखल केलेल्या तक्रारीच्याआधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या सहाजणांविरूद्ध आत्महत्येला प्रवृत्त करणे, त्रास देणे, खंडणी मागणे आणि अपमान करणे हे आरोप लावण्यात आले आहेत.
Video : चेंबूरमध्ये स्वत:वर गोळी झाडून बिल्डरची आत्महत्या