शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

‘या’ कारणासाठी झाला बांधकाम व्यावसायिकाचा खून; बंडगार्डन पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 12:30 PM

बावधन येथील जागेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या प्रकरणाचा निर्णय बांधकाम व्यावसायिक राजेश कानाबार यांच्या बाजूने लागणार असल्यामुळेच त्यांचा खून करण्यात आला. 

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील स्टेट बँकेसमोरील फुटपाथवर बांधकाम व्यावसायिक राजेश कानाबार यांच्या खुनामागील कारण स्पष्ट झाले आहे. बावधन येथील जागेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या प्रकरणाचा निर्णय कानाबार यांच्या बाजूने लागणार असल्यामुळेच त्यांचा खून करण्यात आला. बंडगार्डन पोलिसांनी राहुल कांबळे, रुपेश कांबळे, गणेश कुऱ्हे यांच्यासह आणखी एका मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी कानाबार यांचे वाहनचालक विश्वास दयानंद गंगावणे (वय ३२, रा. गांधीनगर, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. राजेश हरीदास कानाबार ऊर्फ राजूभाई (वय ६४, रा. सोपानबाग, घोरपडी) यांचा सोमवारी दुपारी गोळ्या झाडून खुन करण्यात आला होता. कानाबार यांची बावधन येथे १० एकर जमीन आहे. या जमिनीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात केस सुरु होती. सोमवारी त्यांची तारीख होती. त्याला उपस्थित राहण्यासाठी ते आले होते. या केसचा निकाल कानाबार यांच्या बाजुने लागणार असल्याचे सुनावणीत स्पष्ट झाले. त्यामुळे या जमिनीवर डोळा असणाऱ्यांनी इतरांशी संगनमताने कानाबार यांचा खून केल्याचे गंगावणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.कानाबार हे जिल्हाधिकारी कार्यालयातील काम संपल्यावर दुपारी पावणे तीन वाजता बाहेर आले. शासकीय कोषागाराजवळ लावलेल्या आपल्या गाडीकडे जात होते. तेथील फळविक्रेत्यांकडून त्यांनी फळे घेतली. त्यानंतर ते गाडीत बसण्यासाठी जात होते. त्याचवेळी मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांना अडविले. त्यांच्यापैकी एकाने पिस्तुलातून कानाबार यांच्यावर गोळी झाडली. अगदी जवळून गोळी झाडल्याने ती त्यांच्या छातीवर लागली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर दोघेही हल्लेखोर कॅम्पच्या दिशेने पळून गेले. हा प्रकार त्यांच्या चालकांनी पाहिला. त्याने त्यांना गाडीत बसवून तत्काळ खासगी रुग्णालयात नेले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून सह पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. बंडगार्डन पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिस