बिल्डराला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी; चक्क पोलिसाचाही गुन्ह्यात सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 19:30 IST2021-02-09T19:27:37+5:302021-02-09T19:30:57+5:30

Threatened : पोलीस कर्मचार्‍यासह कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल

Builder threatened with death at gunpoint; The police are also involved in the crime | बिल्डराला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी; चक्क पोलिसाचाही गुन्ह्यात सहभाग

बिल्डराला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी; चक्क पोलिसाचाही गुन्ह्यात सहभाग

ठळक मुद्देपोलीस कर्मचारी संतोष सावंत व त्याचा भाऊ व शुभ ट्रेड बीज इंडिया या कंपनीचा संचालक अभिजित धोंडिबा सावंत व इतर संचालक अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.फिर्यादी व त्यांचे दाजी हे रक्कम मागण्यासाठी अभिजित सावंत यांच्या नर्‍हे येथील कार्यालयात गेले असताना त्यांनी शिवीगाळ करत पिस्तुल दाखवून फिर्यादी यांना ठार मारण्याची धमकी दिली.

पुणे : शुभ ट्रेड बीज इंडिया या कंपनीत पैसे गुंतवणुक केल्यास सोने आणि चारचाकी गाडी देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची पावणे चार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पैसे परत मागितल्यावर बांधकाम व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून खोट्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी पोलीस कर्मचार्‍याने दिली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी पोलीस कर्मचार्‍यासह कंपनीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी संतोष सावंत व त्याचा भाऊ व शुभ ट्रेड बीज इंडिया या कंपनीचा संचालक अभिजित धोंडिबा सावंत व इतर संचालक अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

विचित्र अन् धक्कादायक; कोरोना रुग्णाची लाळ वापरून बॉसला ठार मारण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

गोळीबारात गोल्डमॅन रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला, दुचाकीवरून अज्ञात मारेकरी फरार 

 

याबाबत निखिल लक्ष्मणराव मिरगे (वय २९, रा. सरगम सोसायटी, नांदेड सिटी) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभ ट्रेड बीज कंपनीमध्ये पैसे गुंतविल्यास दरमहा मोठ्या परतावा तसेच दुचाकी, चारचाकी गाड्या, सोने यासारखी मोठी बक्षिसे कंपनीतर्फे देण्याचे येतील असे अमिष दाखविण्यात आले. त्यावर विश्वास बसावा म्हणून वृत्तपत्र, युट्युब, फेसबुक यासारख्या माध्यमातून कंपनीविषयी आकर्षक जाहिराती दिल्या. फिर्यादी यांना कंपनीत ६३ लाख रुपये गुंतविण्यास भाग पाडले.  सुरुवातीला ३ लाख ७८ हजार रुपयांचा परतावा देण्यात आला.

त्यानंतर आतापर्यंत कोणताही परतावा न देता गुंतवणुक केलेल्या रक्कमेचा अपहार केला.  फिर्यादी व त्यांचे दाजी हे रक्कम मागण्यासाठी अभिजित सावंत यांच्या नर्‍हे येथील कार्यालयात गेले असताना त्यांनी शिवीगाळ करत पिस्तुल दाखवून फिर्यादी यांना ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांचा पोलीस खात्यातील भाऊ संतोष सावत यानेही फिर्यादी यांचे दाजी यांना बोलावून घेऊन शिवीगाळ करीत पैसे मागितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली.  गुंडामार्फत त्यांच्या मर्सिडीज गाडीचे वायपर व साईड मिरर तोडून नुकसान केले.

Web Title: Builder threatened with death at gunpoint; The police are also involved in the crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.