शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

धक्कादायक! मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत ठेवला पोत्यात भरून; सहा हजारांच्या तगाद्यामुळे वृद्ध घरमालकिणीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 20:38 IST

Murder Case : भाडेकरू दाम्पत्यासह दोघे साथीदार ताब्यात

ठळक मुद्देएका खोलीत निलेश हनुमंत शिंदे (21) व त्याची पत्नी दीपाली नीलेश शिंदे (१९) यांना भाडेकरू म्हणून ठेवले होते. तुपे यांच्या अंगावरील दागिने काढून घेत त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न करत एका पोत्यात भरून रिकाम्या खोलीत डांबून ठेवल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

नाशिक : वयोवृद्ध घर मालकिणीकडून थकीत घरभाड्याच्या सहा हजारांची वारंवार होणाऱ्या मागणीचा मनात राग धरून भाडेकरू दाम्पत्याने दोन साथीदारांच्या मदतीने वृद्धेची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना चुंचाळे भागात घडल्याचे गुरुवारी(दि.15) उघडकीस आले.

चुंचाळे येथील दत्तनगर भागातील माऊली चौकात राहणाऱ्या जिजाबाई पांडुरंग तुपे (68) यांच्या मालकीच्या लहान तीन खोल्या एकमेकांना लागून आहे. त्यांनी एका खोलीत निलेश हनुमंत शिंदे (21) व त्याची पत्नी दीपाली नीलेश शिंदे (१९) यांना भाडेकरू म्हणून ठेवले होते. एक लहान खोली रिकामी होती आणि एका खोलीत त्या स्वतः राहत होत्या. सहा हजार रुपये घरभाडे थकल्याने तुपे यांनी शिंदे दाम्पत्याकडे ती रक्कम लवकरात लवकर देण्याचं तगादा लावला होता. यामुळे त्यांच्यात काही दिवसांपूर्वी खटकेही उडाले होते. मुळ अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील रहिवासी असलेल्या या पती-पत्नीने संगणमताने घरमालकीन तुपे यांच्या हत्येचा कट रचला आणि संशयित मंगेश बाळू कदम (१९) आणि विष्णू अंकुश कापसे (१९, दोघे रा.विल्होळी) यांना काहीतरी आमीष दाखवून बोलावून घेतले.  या दोघांच्या मदतीने शिंदे दाम्पत्त्याने तुपे यांचा काटा काढल्याचे पोलिसांनी सांगितले.तुपे यांचा संशयित निलेश त्याची पत्नी दीपाली आणि साथीदार मंगेश, विष्णू यांनी दोरीच्या साह्याने गळा आवळून ठार मारले. यानंतर तुपे यांच्या अंगावरील दागिने काढून घेत त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न करत एका पोत्यात भरून रिकाम्या खोलीत डांबून ठेवल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या असून अंबड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही तासांत खुनाचा उलगडावरीष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी घटनेची माहिती मिळताच पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोत्यामध्ये वृद्ध महीलेचे प्रेत गळ्याला दोरीआवळून टाकण्यात आल्याचे निष्पन्न झाले.. दरम्यान या खुनाबद्दल आजूबाजूला चौकशी केली असता जिजाबाई यांच्या खोलीत भाड्याने राहणारा भाडेकरू हा मंगळवार (दि.13) हा पत्नीला घेऊन रात्रीपासून फरार झाल्याची माहिती मिळाली. दरम्यान अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे,  किरण गायकवाड, मुकेश गांगुर्डे, हेमंत आहेर यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार अकोले गाठले. तेथून या दोघा पती-पत्नीला ताब्यात घेऊन अंबड पोलीस ठाण्यात आणले. त्यांना पोलीसी खाक्या दाखविताच सहा हजारांचा तगादा घरमालकिणीने लागवल्याने त्याचा राग येऊन दोघा साथीदारांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसArrestअटक