अपहरण झालेल्या पत्रकाराची निर्घुण हत्या; राहुरी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 12:54 PM2021-04-07T12:54:56+5:302021-04-07T12:55:45+5:30

Kidnapping and murder : या घटनेची माहिती समजताच राहुरी पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला.

The brutal murder of a kidnapped journalist; Incident at Rahuri | अपहरण झालेल्या पत्रकाराची निर्घुण हत्या; राहुरी येथील घटना

अपहरण झालेल्या पत्रकाराची निर्घुण हत्या; राहुरी येथील घटना

Next
ठळक मुद्देपोलिसांना मात्र अपहरणकर्ते मिळून आले नाहीत. अखेर बुधवारी सकाळी दातीर यांचा मृतदेह राहुरी कॉलेज परिसरात आढळून आला.

अहमदनगर: राहुरी येथील पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांचे अपहरण करून हत्या झाल्याची खळबळजनक घटना बुधवारी समोर आली आहे. राहुरी परिसरातील मल्हारवाडी रस्त्यावरून मंगळवारी दुपारी  स्कार्पियोमधून आलेल्या काही जणांनी दातीर यांचे अपहरण केले होते. या घटनेची माहिती समजताच राहुरी पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला.

पोलिसांना मात्र अपहरणकर्ते मिळून आले नाहीत. अखेर बुधवारी सकाळी दातीर यांचा मृतदेह राहुरी कॉलेज परिसरात आढळून आला. दातीर यांची हत्या कोणी व कशासाठी केली हे अद्यापपर्यंत समोर आले नसून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दातीर  यांच्या मारेकऱ्यांच्या शोधासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान श्रीरामपूर येथील व्यापाऱ्याचे अपहरण करून हत्या केल्याची  घटना ताजी असतानाच पुन्हा एका पत्रकारांचे अपहरण करुन हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: The brutal murder of a kidnapped journalist; Incident at Rahuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app