शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

आई-वडील, भावाच्या हत्येसाठी दिले ६५ लाख; मालमत्तेसाठी सख्खा भाऊ झाला वैरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 6:37 AM

हत्येदरम्यान घरातून दागिने, मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम चोरीला गेली नव्हती.

गदग : कर्नाटकातील गदग पोलिसांनी १९ एप्रिल रोजी झालेल्या चार खुनांच्या गुन्ह्याचा तत्काळ छडा लावला आहे. आई-वडील आणि भाऊ कार्तिक बकाले यांच्या हत्येसाठी हल्लेखोरांना ६५ लाख रुपयांची सुपारी देणाऱ्या विनायक बकालेसह आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

विनायकचे आई-वडील वाचले पण भाऊ  कार्तिक (२७) याच्यासह लग्नासाठी आलेले परशुराम हादिमानी (५५), लक्ष्मी हादिमानी (४५) आणि आकांक्षा  (१६) या नातेवाईकांची हत्या करण्यात आली. कार्तिक हा भाजपचे नेते प्रकाश बकाले आणि सुनंदा बकाले यांचा मुलगा होता. हत्येदरम्यान घरातून दागिने, मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम चोरीला गेली नव्हती. त्यामुळे या मागे दरोडा नसून आणखी काहीतरी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त करत तपास सुरू केला होता.

दोन जुळे भाऊही हत्येत झाले सहभागीपोलिस महानिरीक्षक (उत्तर विभाग) विकास कुमार यांनी सांगितले की त्यांनी विनायक बकाले (३५), फिरोज खाझी (२९), जिशान खाझी (२४) यांना गदग येथून अटक केली आहे, तर जुळे भाऊ साहिल अशफाक खाझी (१९), सोहेल अशफाक खाजी (१९) यांच्यासह सुलतान जिलानी शेख (२३), महेश जगन्नाथ साळुंके (२१) आणि वाहीद लियाकत बेपारी (२१) यांना महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज येथून अटक करण्यात आली आहे. विनायकने फिरोजला मारण्यासाठी ६५ लाख रुपयांची सुपारी दिली होती.

नेमके काय झाले? या हत्येमागे भावांमधील मालमत्तेचा वाद असल्याचा संशय आहे. प्रकाश यांना त्यांची सर्व मालमत्ता कार्तिकला द्यायची होती, त्यामुळे विनायकला राग आला होता. या रागातूनच त्याने आईवडील आणि भावाला संपवण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी