मृतदेहासोबत बसून होता भाऊ; मनोरुग्ण भावाकडून बहिणीची चाकू भोसकून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 21:52 IST2021-12-03T21:51:28+5:302021-12-03T21:52:34+5:30

Murder Case : उल्हासनगर कॅम्प नं-३ सचदेवनगर मधील आदित्य सोसायटी मध्ये अरुणा म्हैसकर-४३ ह्या भाऊ योगेश-४७ यांच्या सोबत राहत होते. इमारतीचा प्लॅट अरुणा हिच्या वडिलांच्या नावाने असून दोघेही अविवाहित होते.

The brother was sitting with the deadbody; Sister stabbed to death by mentally ill brother | मृतदेहासोबत बसून होता भाऊ; मनोरुग्ण भावाकडून बहिणीची चाकू भोसकून हत्या

मृतदेहासोबत बसून होता भाऊ; मनोरुग्ण भावाकडून बहिणीची चाकू भोसकून हत्या

सदानंद नाईक

उल्हासनगर : सी ब्लॉक परिसरातील आदित्य सोसायटी या इमारतीमध्ये राहणाऱ्या मनोरुग्ण भावाने दोन दिवसांपूर्वी बहिणीची चाकू मारून खून केल्याची घटना उघड झाली. घरातून दुर्गंधी आल्याने प्रकार उघड झाली असून बहिणीच्या मृतदेहासोबत भाऊ घरातच राहत होता. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीसांनी भावाला ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

उल्हासनगर कॅम्प नं-३ सचदेवनगर मधील आदित्य सोसायटी मध्ये अरुणा म्हैसकर-४३ ह्या भाऊ योगेश-४७ यांच्या सोबत राहत होते. इमारतीचा प्लॅट अरुणा हिच्या वडिलांच्या नावाने असून दोघेही अविवाहित होते. शुक्रवारी दुपारी अड्डीच वाजण्याच्या दरम्यान म्हैसकर यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजारील नागरिकांनी मध्यवर्ती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, घरात अरुणाचा मृतदेह पडून होता. दोन दिवसांपूर्वी तीचा चाकूने भोकसून खून केल्याचे उघड झाले असून मृतदेहा

सोबत भाऊ योगेश हा घरात राहत होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तर तपासणी साठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविला. तर भाऊ योगेश याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तो मनोरुग्ण असल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

Web Title: The brother was sitting with the deadbody; Sister stabbed to death by mentally ill brother