सख्खा भाऊ १२ वर्षाच्या बहिणीच्या अब्रूशी खेळला; गरोदर राहिल्याने विचित्रप्रकार उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 20:59 IST2021-03-16T20:59:33+5:302021-03-16T20:59:59+5:30
Sexual Harrasment : पुढील तपासणीसाठी पीडित मुलीला रुग्णालयात नेलं तेव्हा ती सात महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती कळली असल्याचे पीडितेच्या आईने पोलिसांना सांगितली.

सख्खा भाऊ १२ वर्षाच्या बहिणीच्या अब्रूशी खेळला; गरोदर राहिल्याने विचित्रप्रकार उघडकीस
चंदीगड : हरियाणाच्या जींद जिल्ह्यात एक धक्कादायक आणि विचित्रप्रकार घटना उघडकीस आली आहे. बहीण आणि भावाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने खळबळ माजली आहे. सख्ख्या भावाने लैंगिक अत्याचार केल्याने १२ वर्षांची अल्पवयीन मुलगी गरोदर राहीली आहे. मुलीच्या वैद्यकीय तपासणीनंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
मुलीने याप्रकरणी आपल्या १४ वर्षीय मोठ्या भावावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. मुलीच्या आईने याप्रकरणी आरोपी भावाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचं वय हे फक्त साडे बारा वर्ष आहे. तर पीडित मुलगी साडेसात महिन्यांची गर्भवती आहे. पीडितेच्या गेल्या दोन-तीन दिवसांपासून पोटात वेदना होत होत्या. याशिवाय तिच्या पोटाचा आकारही वाढला होता. त्यामुळे तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यानंतर पुढील तपासणीसाठी पीडित मुलीला रुग्णालयात नेलं तेव्हा ती सात महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती कळली असल्याचे पीडितेच्या आईने पोलिसांना सांगितली.
पीडित मुलीची पोलिसांनी चौकशी केली, त्यावेळी आपल्या १४ वर्षांच्या मोठ्या भावाने गेल्यावर्षी लैंगिक शोषण केल्याचे अल्पवयीन मुलीने सांगितले. घरात कुणी नसताना मोठा भाऊ वारंवार तशाप्रकारचं दुष्कृत्य करायचा, असं पीडितेच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडित आणि पीडितेच्या लैंगिक शोषण करणारे दोन्ही अल्पवयीन असून संवेदनशील गुन्हा आहे. याप्रकरणी पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.