शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
2
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
3
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
4
Video: 'माझा काय संबंध, मला...', मुस्तफिजूर रहमानबाबत प्रश्न विचारताच नबी पत्रकारावर चिडला
5
Shikhar Dhawan And Sophie Shine Engagement : "आम्ही आयुष्यभरासाठी..." शिखर-सोफीनं शेअर केली साखरपुड्याची गोष्ट
6
Crime: रस्त्यातून अपहरण, जबरदस्तीनं दारू पाजली अन् रात्रभर सामूहिक अत्याचार; बिहार हादरलं!
7
TCS च्या नफ्यात १४ टक्क्यांची मोठी घट! तरी गुंतवणूकदारांना करणार मालामाल; लाभांश जाहीर
8
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
9
हत्येनंतर मृतदेह पाण्यानं स्वच्छ धुतला अन् त्यानंतर...; थरकाप उडवणारी घटना समोर, नरभक्षकाला अटक
10
अंघोळीसाठी गेलेली मुलं बाहेर येईना; ४ वर्षांच्या रयानचा मृत्यू, दरवाजा तोडताच दिसलं भयंकर
11
अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये 'सोनिक वेपन' वापरले? हे हत्यार कानातून रक्त काढते
12
सोन्याच्या दुकानात चोरी केली, परत जाताना गुटखा खाण्यासाठी मास्क काढला अन् सीसीटीव्हीत कैद झाला, पोहोचला तुरुंगात
13
Travel : २६ जानेवारीचा लॉन्ग वीकेंड आणि वृंदावनची वारी! कान्हाच्या नगरीत फिरण्यासाठी 'हे' आहे परफेक्ट प्लॅनिंग
14
आमचा अणुबॉम्ब भारत, इस्रायल, अमेरिकेच्या विरोधात...', अणु सिद्धांतावर पाकिस्तानचा मोठा दावा
15
"आम्ही कुणाला गुलाम बनवलं नाही, आम्ही तर...", काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ४० वर्षांनी 'ती' म्हणाली 'हो', तरुणपणी झालं नाही लग्न; आता जुळल्या रेशीमगाठी
17
मुकुल अग्रवाल यांनी विकत घेतले 100 वर्ष जुन्या कंपनीचे तब्बल 4 कोटी शेअर, ₹18 वर आलाय भाव; तुमच्याकडे आहेत का?
18
आता कानावरही विश्वास ठेवू नका; इंदूरमध्ये भावाच्या आवाजात फोन आला अन् शिक्षिकेचे ९७ हजार उडाले!
19
हॉर्मुझचा जलमार्ग इराण रोखणार? जागतिक तेल बाजार धास्तावला; पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकणार?
20
BBL: बिग बॅश लीगमध्ये रिझवानचा घोर अपमान; कर्णधारानं भर मैदानातून धाडलं बाहेर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दीर आणि वहिनीने ट्रेनसमोर उडी मारून केली आत्महत्या; १२ दिवसांपूर्वी पळाले होते घरातून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 15:37 IST

Suicide Case : तरुणाच्या मृतदेहाजवळून आधारकार्ड सापडले, त्यावरून अमन हा घोघाडीपूर गावचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. परमजीत कौर असे या महिलेचे नाव आहे. हे आत्महत्या प्रकरण आहे.

करनाल - हरियाणातील करनाल जिल्ह्यातील घोघारीपूर या गावातील रहिवाशी २७ वर्षीय अमन आणि ३४ वर्षीय परमजीत यांनी शान-ए-पंजाब ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू होते. दोघेही गेल्या १२ दिवसांपासून घरातून पळून गेले होते. सकाळी त्यांच्या मृत्यूची बातमी नातेवाईकांना समजली. रेल्वे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.घोघाडीपूर गावातील रहिवासी राय सिंह यांनी सांगितले की, अमन आणि परमजीत हे एकमेकांचे दीर आणि वहिनी आहे. परमजीतचा १२ वर्षांपूर्वी मनोजसोबत विवाह झाला होता. त्यांना तीन मुले आहेत. अमनचे लग्न झालेले नाही. काही दिवसांपूर्वी अमन-परमजीत घरातून पळून गेले होते, त्यांना १५ दिवसांनी शोध घेऊन घरी आणण्यात आले.परमजीत तिच्या मुलांसोबत राहत होती आणि अमनला गावातून हाकलून दिले. मात्र, काही दिवसांपूर्वी दोघेही बेपत्ता झाले होते. कोणीतरी फोन करून सांगितले की, अमन रेल्वे रुळावर आढळून आला आहे, त्याच्यासोबत एक महिलाही आहे. घरच्यांनी शहनिशा केल्यानंतर ते दोघे अमन आणि परमजीत असल्याचं उघड झालं. दोघांचे एकमेकांशी विवाहबाह्य संबंध होते.त्याचवेळी गावातील आणखी एका रहिवाशाने सांगितले की, सकाळी अमन आणि परमजीतने आत्महत्या केल्याचे समजले. दोघेही गावातून पळून गेले होते. शवविच्छेदनानंतर तो मृतदेह घरी नेणार आहे. उपनिरीक्षक काश्मीर सिंह यांनी सांगितले की, सकाळी नऊच्या सुमारास रेल्वे रुळावर मृतदेह असल्याची माहिती मिळाली.तरुणाच्या मृतदेहाजवळून आधारकार्ड सापडले, त्यावरून अमन हा घोघाडीपूर गावचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. परमजीत कौर असे या महिलेचे नाव आहे. हे आत्महत्या प्रकरण आहे. आत्महत्येचे कारण काय याबाबत पोलीस तपास करतील. दोघांनीही शान-ए-पंजाब ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे. सध्या नातेवाईकांच्या तक्रारीच्या आधारे 174 ची कारवाई करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसHaryanaहरयाणाDeathमृत्यू