वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:43 IST2025-06-06T12:42:55+5:302025-06-06T12:43:32+5:30

तरुणीच्या घरात शिरून आरोपीने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने याला विरोध करताच त्याने तिच्यावर अॅसिड फेकलं.

Brother-in-law was blinded by lust, cast an evil eye on his sister-in-law, and committed a big scandal when she was rejected! | वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!

वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!

बिहारच्या मुजफ्फरपूरमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भावोजीनं स्वतःच्या मेहुणीवर वाईट नजर टाकली आणि आपल्या दुष्कर्मात यश न मिळताच त्याने तिच्यावर अॅसिड टाकून तिला विद्रूप करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे कुटुंबात खळबळ माजली आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिने स्वतः या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. 

मुजफ्फरपूरच्या सिकंदरपुरमध्ये राहणाऱ्या तरुणीच्या घरात शिरून आरोपीने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने याला विरोध करताच त्याने तिच्यावर अॅसिड फेकलं. या हल्ल्यात तरुणीच्या डोळ्यांना आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या तरुणीच्या बहिणीच्या पतीनेच तिच्यासोबत हे दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याने घरातील कपाट उघडून सगळे दागिने घेतले आणि पीडितेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेला.

कौटुंबिक वाद
प्राथमिक तपासात हे प्रकरण कौटुंबिक वादाशी संबंधित असल्याचे दिसून आले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीची पत्नी गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता आहे आणि तो त्याच्या मेहुणीला म्हणजेच पीडितेला यासाठी जबाबदार ठरवत आहे. याप्रकरणी कांती पोलीस ठाण्यात एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. 

सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि पीडितेच्या जबाबाच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे. 

Web Title: Brother-in-law was blinded by lust, cast an evil eye on his sister-in-law, and committed a big scandal when she was rejected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.