खळबळजनक! भावाने बहिणीच्या प्रियकराची कुऱ्हाडीने केली निर्घृण हत्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 21:49 IST2019-06-03T21:47:38+5:302019-06-03T21:49:01+5:30

सूरज पाल सिंह असे मृत तरुणाचे नाव आहे.

The brother had murdered a sister's boyfriend | खळबळजनक! भावाने बहिणीच्या प्रियकराची कुऱ्हाडीने केली निर्घृण हत्या  

खळबळजनक! भावाने बहिणीच्या प्रियकराची कुऱ्हाडीने केली निर्घृण हत्या  

ठळक मुद्देप्रियकराची मुलीच्या भावाने कुऱ्हाडीने तुकडे तुकडे करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. =

लखनौ - उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत असलेल्या मुलीला घराच्या मंडळीने बेदम मारहाण केली. यावेळी जीव वाचविण्याच्या भीतीने तिला तिथेच सोडून पळालेल्या प्रियकराची मुलीच्या भावाने कुऱ्हाडीने तुकडे तुकडे करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सूरज पाल सिंह असे मृत तरुणाचे नाव आहे.

सूरज पाल व गावातील एका तरुणीचे प्रेमसंबंध होते. परंतु, दोघांच्याही घरच्यांचा विरोध होता. यावरून दोघांच्याही घरात सतत वाद व्हायचा. मात्र, सूरज पाल आणि तरुणी त्याकडे सतत दुर्लक्ष करायचे. शनिवारी तरुणी घरात एकटी असताना सूरज पाल तिला भेटण्यास आला. दोघेही आक्षेपार्ह स्थितीत असतानाच अचानक मुलीचा भावाने घरात प्रवेश केला. बहिणीला अशा स्थितीत बघुन त्याचा रागाचा पारा वाढला आणि  त्याने बहिणीला मारहाण करण्यास सुरूवात केली. यादरम्यान सूरज पालने तिथून पळ काढला. मारहाणीत तरुणी बेशुद्ध होताच भावाने सूरज पालचा पाठलाग करून त्याला रस्त्यातच गाठले. ते बघताच सूरज पालने जवळच्या पिस्तुलातून तरुणावर गोळी झाडली. त्यानंतर तरुणीच्या घरातले घटनास्थळी पोहचले. जवळ पडलेल्या कुऱ्हाडीने तरुणीच्या भावाने तिच्या प्रियकराच्या मानेवर व छातीवर वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. 

Web Title: The brother had murdered a sister's boyfriend