शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

भाऊ आणि भावजयीची करणीच्या संशयावरून ओल्या वस्त्राने धिंड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 9:31 AM

Crime News : करणी केल्याच्या संशयावरून मोठा भाऊ आणि भावजयीची ओल्या वस्त्रानिशी गावातून धिंड काढल्याची घटना सारोळा (ता. पाचोरा) येथे बुधवारी सकाळी घडली.

पाचोरा (जि. जळगाव) : करणी केल्याच्या संशयावरून मोठा भाऊ आणि भावजयीची ओल्या वस्त्रानिशी गावातून धिंड काढल्याची घटना सारोळा (ता. पाचोरा) येथे बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी पाचोरा पोलिसांत लहान भाऊ व त्याच्या परिवारासह सात जणांविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दोघा भावांमधील अंतर्गत  वाद असला, तरी या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.  देवीदास पाटील, मंगलाबाई पाटील, गणेश पाटील, ज्योती पाटील, मयूरी पाटील, अनिल पाटील व विलास शिंदे अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रमेश पाटील व रंजनाबाई रमेश पाटील हे सारोळा येथे मुलगा शांताराम व सून दैवशाला हिच्यासह वास्तव्यास आहेत. रंजनाबाईने गाईवर करणी केल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल झालेल्या सातही जणांनी बुधवारी रंजना व तिच्या पतीच्या अंगावर पाणी टाकले आणि ओल्या कपड्यानिशी गावातून धिंड काढली. त्यानंतर मारुतीच्या मूर्तीवर पाणी टाकण्यास भाग पाडले. शनिवारी सकाळीही पुन्हा आरोपींनी पीडित कुटुंबाला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर अंनिस कार्यकर्त्या दर्शना पवार (अमळनेर),  अंनिसचे तालुकाध्यक्ष प्रा. अतुल सूर्यवंशी यांच्या मदतीने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. समोरच्या गटानेही रमेश पाटील व त्यांच्या परिवाराविरुद्ध फिर्याद दिली आहे.

करणीच्या संशयावरून हा प्रकार झाला असल्याचा संशय आहे.  पाणी कुणी टाकले?, धिंड काढली की स्वतःहून पाणी टाकायला गेले हा तपासाचा भाग आहे.  फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. गावात चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येत आहे. - किसनराव नजन पाटील, पोलीस निरीक्षक, पाचोरा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव