ब्युटी पार्लरमध्ये मेकअप करत होती नवरी, मोबाइलवर नवरदेवाचा मेसेज आला अन् ऐनवेळी मोडलं लग्न...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 09:04 AM2021-04-30T09:04:53+5:302021-04-30T09:15:10+5:30

जेव्हा पुष्पलता ब्युटी पार्लरमध्ये तयार होत होती तेव्हा तिला मोबाइलवर मेसेज आला. हा मेसेज नवरदेवाचा होता आणि त्याने त्यात लिहिले होते की, ते आता वरात घेऊन येणार नाही.

Bride was in beauty parlour groom broke up marriage sending massage on mobile Kanpur Uttar Pradesh | ब्युटी पार्लरमध्ये मेकअप करत होती नवरी, मोबाइलवर नवरदेवाचा मेसेज आला अन् ऐनवेळी मोडलं लग्न...

ब्युटी पार्लरमध्ये मेकअप करत होती नवरी, मोबाइलवर नवरदेवाचा मेसेज आला अन् ऐनवेळी मोडलं लग्न...

Next

लग्न लागण्याआधी नवरी ब्युटी पार्लरमध्ये मेकअप करत होती. अशात तिच्या मोबाइलवर एक मेसेज आला. तो मेसेज पाहून तिला धक्का बसला. नवरीला मोबाइलवर आलेला हा मेसेज नवरेदेवाचा होता. त्याने लिहिले होते की, आता तो वरात घेऊन येणार नाही. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून समोर आली आहे. 

इथे लग्न लागण्याच्या काहीवेळ आधी नवरदेवाकडील लोकांनी लग्न मोडल्याचा मेसेज केला. नवरदेवाने नवरीच्या मोबाइलवर फोन केला की, आपलं लग्न कॅन्सल झालं आहे. आता ते वरात घेऊन येणार नाहीत. पूर्ण तयारी करून नवरदेवाची वाट पाहणाऱ्या नवरीला अर्थातच या मेसेजने धक्का बसला. अशात नवरीच्या परिवाराने पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी तपास सुरू केला. (हे पण वाचा : Girlfriend ने केली Boyfriend ची गळा चिरून हत्या, दुसऱ्या महिलेसोबत फोनवर बोलणं पडलं महागात!)

कानपूरच्या पनकी पोलीस स्टेशन परिसरातील कंगागंज कॉलनीमध्ये राहणाऱ्या पुष्पलताचं लग्न महाराजपूर येथील क्रांती सिंहसोबत ठरलं होतं. २८ एप्रिलला ठरल्याप्रमाणे वरात येणार होती. मुलीच्या घरी वरातीच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू होती. तर नवरी मैत्रीणींसोबत ब्युटी पार्लरमध्ये मेकअप करत होती.

जेव्हा पुष्पलता ब्युटी पार्लरमध्ये तयार होत होती तेव्हा तिला मोबाइलवर मेसेज आला. हा मेसेज नवरदेवाचा होता आणि त्याने त्यात लिहिले होते की, ते आता वरात घेऊन येणार नाही. हे लग्न कॅन्सल झालं आहे. हा मेसेज वाचून नवरीला धक्का बसला. तिने हा मेसेज घरातील लोकांना दाखवला. ज्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेलं. मुलीने पोलिसांना सांगितले की, हुंड्याच्या मागणीवरून हे लग्न कॅन्सल झालं आहे. (हे पण वाचा : Video : मुलीच्या विनयभंगाची तक्रार करणाऱ्या आईने मागितली २५ लाखांची खंडणी )

पुष्पलताने स्पष्टपणे सांगितले की, ती आता या मुलासोबत लग्न करणार नाही. आणि ती मुलाला आणि त्याच्या परिवाराला शिक्षा नक्की मिळवून देणार. तिने सांगितले की, अशाप्रकारे लग्न कॅन्सल झाल्याने मोठी बदनामी झाली. लग्नासाठी ३० लाख रूपये खर्च केला आहे. १२ लाख रूपयांची गाडी खरेदी केली होती. मात्र, हुंड्याच्या लालची मुलाकडील लोक समाधानी नव्हते.
 

Read in English

Web Title: Bride was in beauty parlour groom broke up marriage sending massage on mobile Kanpur Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.