Video : मुलीच्या विनयभंगाची तक्रार करणाऱ्या आईने मागितली २५ लाखांची खंडणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 09:28 PM2021-04-29T21:28:26+5:302021-04-29T21:29:38+5:30

Molestation And Extortion : अल्पवयीन मुलीच्या आईला लासलगाव ग्रामीण पोलिसांनी 25 लाख रुपयांची खंडणी घेताना अटक केली आहे.

Video: Mother complains of daughter's molestation, demands Rs 25 lakh ransom | Video : मुलीच्या विनयभंगाची तक्रार करणाऱ्या आईने मागितली २५ लाखांची खंडणी 

Video : मुलीच्या विनयभंगाची तक्रार करणाऱ्या आईने मागितली २५ लाखांची खंडणी 

Next
ठळक मुद्देश्रीरामपूर येथील अल्पवयीन मुलीशी जामनेरचे नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी त्यांचा पुतण्यासोबत विवाह लावून दिल्याने त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नाशिक : जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्याविरोधात काही महिन्यांपूर्वी विनयभंगाची फिर्याद नोंदविणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या आईला लासलगाव ग्रामीण पोलिसांनी 25 लाख रुपयांची खंडणी घेताना अटक केली आहे.

श्रीरामपूर येथील अल्पवयीन मुलीशी जामनेरचे नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी त्यांचा पुतण्यासोबत विवाह लावून दिल्याने त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात संशयित पारस ललवाणी यांच्यावर विनयभंगाचा आरोप संबंधित अल्पवयीन मुलीने केला आहे.

या प्रकरणातील अल्पवयीन मुलीने नोंदवलेली फिर्याद मागे घेण्यासाठी त्या मुलीच्या आईने पारस ललवाणी यांच्याकडे 25 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. ती रक्कम देण्यासाठी नाशिकच्या लासलगाव तालुक्यातील टाकळी-विंचुर शिवारातील ऐश्वर्या लॉजवर ही भेट ठरली. याची कुणकुण नाशिक ग्रामीण पोलिसांना लागली. पोलिसांनी छापा टाकून अल्पवयीन मुलीच्या आईला खंडणीची रक्कम घेताना रंगेहात ताब्यात घेतले आहे.

या सर्व घटनेत त्या अल्पवयीन मुलीने दोन मार्चला पती संशयित वृषभ ललवाणी, चुलत सासरे असलेले जामनेरचे माजी नगराध्यक्ष संशयित पारस ललवाणी यांच्यासह सुनील कोचर, चांदूलाल कोठारी, भावेश ललवाणी, विकास ललवाणी, भावना ललवाणी यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात आपल्या इच्छेविरुद्ध विवाह करून विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Video: Mother complains of daughter's molestation, demands Rs 25 lakh ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.