शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

लायसन्स सस्पेंड करण्याच्या नावाखाली उकळली जाते लाच; वाहतूक शाखेच्या पोलिसाला सापळा रचून पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 10:53 PM

एका विद्यार्थ्यांने दंड भरल्यानंतरही त्याला लायसन्स सस्पेंड करण्याची धमकी देऊन लाच मागणा-या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचा-याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मंगळवारी सायंकाळी पकडले. 

पुणे : वाहतूकीचे नियम मोडणा-यांवर शहर पोलीस दलाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी दोनपेक्षा अधिक वेळा नियमभंग करणा-यांचे लायसन्स सस्पेंड करण्याचा इशारा दिला असून आतापर्यंत अनेकांचे लायसन्स काही कालावधीसाठी आरटीओने निलंबित केले आहेत. वरिष्ठांच्या या कठोर कारवाई करण्याच्या आदेशाचा आता पोलीस कर्मचारी गैरफायदा घेऊन लागल्याचे दिसून येऊ लागले आहे. एका विद्यार्थ्यांने दंड भरल्यानंतरही त्याला लायसन्स सस्पेंड करण्याची धमकी देऊन लाच मागणा-या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचा-याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मंगळवारी सायंकाळी पकडले. 

पोलीस नाईक चंद्रकांत रासकर (वय ३८, नेमणूक चतु:श्रृंगी वाहतूक विभाग) असे त्यांचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी, फर्ग्युसन महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने सेनापती बापट रोडवरील जे. डब्ल्यु मेरियड चौकात मंगळवारी सकाळी वाहतूक नियमभंग केल्याने रासकर यांनी त्याला बाजूला घेतले. त्याने २०० रुपये दंड भरला. त्यानंतर रासकर यांनी तुझे लायसन्स सस्पेंड करतो, असे त्याला सांगितले. त्यावर या विद्यार्थ्याने तसे करु नका. मी बाहेरगावाहून आलो आहे़ माझी अडचण होईल असे सांगितले. त्यावर रासकर यांनी त्याच्याकडे एक हजार रुपयांची मागणी केली.तेव्हा हा विद्यार्थी माझ्याकडे इतके पैसे नाहीत असे सांगितले़ त्यावर रासकर यांनी त्याला ५०० रुपये घेऊन ये मग लायसन्स देतो, असे सांगितले. त्यानंतर या विद्यार्थ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. त्यांच्या तक्रारीची पडताळणी केली असता रासकर यांनी ४०० रुपये घेण्याचे मान्य केले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सेनापती बापट रोडवरील जे. डब्ल्यु मेरियट चौकात सापळा रचला. तक्रारदाराकडून सायंकाळी ४०० रुपये घेतला रासकर यांना पकडण्यात आले. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे