शिपायाकडून घेतली २ हजारांची लाच; ग्रामसेवकासह विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 19:15 IST2021-08-30T19:15:23+5:302021-08-30T19:15:50+5:30

Bribe Case : तक्रारदार ग्रामपंचायत कंडारी बुद्रुक येथे शिपाई म्हणून नोकरीस असून त्यांना सन-२०१५-१६ या वित्तीय वर्षात त्यांना जादा वेतन दिले गेले होते.

Bribe of Rs 2,000 taken from a peon; Extension Officer with GramSevak in ACB's net | शिपायाकडून घेतली २ हजारांची लाच; ग्रामसेवकासह विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

शिपायाकडून घेतली २ हजारांची लाच; ग्रामसेवकासह विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

ठळक मुद्देधरणगाव पंचायत समितीचा विस्तार अधिकारी सुरेश शालीग्राम कठाळे (वय ५१) यालाही या प्रकरणात अटक करण्यात आली असून त्यातील एक हजार रुपये हे कठाळे याच्यासाठी होते.

जळगाव : जादा वेतनाची परतफेड करण्यासाठी जिल्हा परिषदेला अनुकूल अहवाल पाठवायच्या बदल्यात प्रत्येक दोन हजाराची लाच घेताना कंडारी बुद्रकु, ता.धरणगाव येथील ग्रामसेवक कृष्णकांत राजाराम सपकाळे (वय ४५)याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दुपारी चोपडा नजीक एका हॉटेलमधून पकडले. धरणगाव पंचायत समितीचा विस्तार अधिकारी सुरेश शालीग्राम कठाळे (वय ५१) यालाही या प्रकरणात अटक करण्यात आली असून त्यातील एक हजार रुपये हे कठाळे याच्यासाठी होते.


तक्रारदार ग्रामपंचायत कंडारी बुद्रुक येथे शिपाई म्हणून नोकरीस असून त्यांना सन-२०१५-१६ या वित्तीय वर्षात त्यांना जादा वेतन दिले गेले होते. जादा देण्यात आलेल्या रक्कमेची परतफेड करण्याबाबत तक्रारदार यांना नोटीस आली होती. या नोटीसचा अनुकूल अहवाल जिल्हा परीषदेला पाठविण्याच्या मोबदल्यात आरोपी ग्रामसेवक सपकाळे व विस्तार अधिकारी कठाळे यांनी शिपायाकडे प्रत्येकी एक हजार या प्रमाणे दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.  

Web Title: Bribe of Rs 2,000 taken from a peon; Extension Officer with GramSevak in ACB's net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.