लाचखोर उपकार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 17:37 IST2018-07-18T17:37:37+5:302018-07-18T17:37:56+5:30

पाली पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध कायदा कलम ७ अन्वये गुन्हा दाखल

Like a bribe of 1 lakh, the assistant engineer of ACB is in the trap | लाचखोर उपकार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात 

लाचखोर उपकार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात 

रायगड -   तक्रारदार हे इलेक्ट्रीकल कँन्ट्रँक्टर असून त्यांच्या  रायगड येथील पाली देऊळ वाडा येथे विनायक कन्स्ट्रक्शनच्या नविन बिल्डींग वसाहती मध्ये इलेक्ट्रीक मीटर देण्याकरीता आणि भिलपाडा, तालुका सुधागड, जिल्हा  रायगड येथील गजानन माटे व सदानंद पाटील यांच्या कन्स्ट्रक्शनला ट्रान्सफार्मर, इलेक्ट्रीक पोल बसविण्यास मंजुरी देण्यासाठी  तक्रारदार यांच्याकडे उपकार्यकारी अभियंता मुकेश नथुजी गजभियेने १ लाख इतकी लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार लाच देण्यास तयार नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाला (एसीबी) याबाबत ३१ जानेवारी २०१८ रोजी माहिती दिली होती. त्यानंतर रायगड जिल्यातील रोह्यातील उपकार्यकारी अभियंता मुकेश गजभियेच्याविरोधात आज रायगडमधील पाली पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध कायदा कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Like a bribe of 1 lakh, the assistant engineer of ACB is in the trap