Breaking: Hardik Patel arrested from Ahmedabad | Breaking : हार्दिक पटेल यांना अहमदाबाद येथून अटक

Breaking : हार्दिक पटेल यांना अहमदाबाद येथून अटक

ठळक मुद्दे२४ जानेवारी रोजी हार्दिक पटेल यांना कोर्टात हजर राहण्यास सांगितलं होते.वॉरंट जारी झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हार्दिक पटेल यांना ताब्यात घेतले आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस नेता हार्दिक पटेलला देशद्रोहाच्या प्रकरणात त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावल्यानंतर आज हार्दिक पटेल यांना अहमदाबाद जिल्ह्यातील वीरमगावनजीक अटक करण्यात आली आहे. २४ जानेवारी रोजी हार्दिक पटेल यांना कोर्टात हजर राहण्यास सांगितलं होते. त्यापूर्वीच पोलिसांनी पटेल यांना ताब्यात घेतले आहे. हार्दिक यांना उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

नेमकं काय प्रकरण ?
ऑगस्ट २०१५ मध्ये पाटीदार आंदोलकांच्या आंदोलनादरम्यान हार्दिक पटेल यांच्या सभेनंतर गुजरात येथील विविध परिसरात हिंसाचार पेटला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात तोडफोडही करण्यात आली होती. याप्रकरणी हार्दिक पटेल यांच्यावर ऑक्टोबर २०१५ मध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत सुनावणीला हार्दिक पटेल वारंवार गैरहजर राहत असल्यामुळे अहमदाबादमधील न्यायालयाने त्यांच्याविरोधात आज अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं. वॉरंट जारी झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हार्दिक पटेल यांना ताब्यात घेतले आहे.

 

Web Title: Breaking: Hardik Patel arrested from Ahmedabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.