शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

प्रेयसीला दगडाने ठेचून स्वत:चा चिरला गळा, रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होता प्रियकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 17:22 IST

Murder Case : लोहारा एमआयडीसीतील घटना, मुलीचा जागीच मृत्यू, युवक गंभीर

यवतमाळ : शहरातील दारव्हा मार्गावरील लोहारा एमआयडीसी परिसर प्रेमीयुगुलांचा अड्डा बनला आहे. पावर हाऊसमागील भागात एक युवक रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर तडफडत दिसला. याची माहिती लोहारा पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठले असता त्या युवकाने स्वत:च्या प्रेयसीचा दगडाने ठेचून खून केल्याचे सांगितले व नंतर तो बेशुद्ध झाला. त्याला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही थरारक घटना गुरुवारी सकाळी १०.३० वाजता दरम्यान घडली.

आस्था सुरेश तुंबडे (१८) रा. गुरुकृपा सोसायटी जुना उमरसरा असे मृत मुलीचे नाव आहे. तर शुभम अशोक बकाल (२३) रा. शिंदेनगर असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. शुभम हा वडिलाची दुचाकी एमएच-२९-बीएम-३१४६ हिने लोहारा एमआयडीसी परिसरात पोहोचला. त्याने सोबत आस्थाला घेतले. या झुडपी वजा जंगलात दोघांमध्ये नेमका कशावरुन वाद झाला, हे स्पष्ट नाही. या वादात संतापलेल्या शुभमने आपल्याच प्रेयसीचा दगडाने ठेचून खून केला. त्याने अतिशय निर्दयीपणे आस्थाच्या चेहऱ्यावर दगडाने घाव घातले. तिचा पूर्ण जबडा फोडला. ती ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर शुभमने ब्लेडने स्वत:च्या डाव्या हाताची नस कापली. नंतर स्वत:चा गळा ब्लेडने चिरला. रक्ताच्या थारोळ्यात तडफडत शुभम झुडूपी वजा जंगलातून मुख्य रस्त्यावर आला. तेथे तो योगेश यादव नामक व्यक्तीला दिसला. योगेशने तत्काळ याची माहिती लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे यांना दिली. काही क्षणातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी शुभमला तातडीने शासकीय रुग्णालयात हलविले. तर आस्था ही जागेवरच गतप्राण झाल्याचे आढळून आले.

सुरुवातीला प्रेमीयुगुलावर कुणी हल्ला तर केला नाही ना अशी शंका व्यक्त होत होती. मात्र परिसरातच आरोपी शुभमची दुचाकी आढळून आली. शिवाय आस्थाच्या जवळ तिच्या शाळेची बॅग व इतर कागदपत्रही त्यात आढळून आले. यावरून दोघांची काही तासाच ओळख पटली. त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. या प्रकरणी आस्थाचे वडील सुरेश तुंबडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शुभम विरोधात कलम ३०२, ३०९ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया लोहारा पोलीस ठाण्यात सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळPoliceपोलिसDeathमृत्यू