दोन दिवसांपासून बेपत्ता होती बीएला शिकणारी तरूणी, बॉयफ्रेन्ड म्हणाला - मीच तिला मारलं आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 18:16 IST2022-01-25T18:13:59+5:302022-01-25T18:16:04+5:30

Uttar Pradesh Crime News : तरूणी दोन दिवसांआधी संशयास्पदरित्या गायब झाली होती.  ज्यानंतर तिचा मृतदेह जंगलातील एका कोरड्या विहिरीत आढळून आला होता.

Boyfriend murdered Girlfriend in Prayagraj Uttar Pradesh | दोन दिवसांपासून बेपत्ता होती बीएला शिकणारी तरूणी, बॉयफ्रेन्ड म्हणाला - मीच तिला मारलं आणि....

दोन दिवसांपासून बेपत्ता होती बीएला शिकणारी तरूणी, बॉयफ्रेन्ड म्हणाला - मीच तिला मारलं आणि....

Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून एक हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे बीएला शिकणाऱ्या एका  १८ वर्षीय विद्यार्थीनीला किडनॅप करून तिची हत्या करण्यात आली. तरूणी दोन दिवसांआधी संशयास्पदरित्या गायब झाली होती.  ज्यानंतर तिचा मृतदेह जंगलातील एका कोरड्या विहिरीत आढळून आला होता.

याप्रकरणी पोलिसांनी तरूणीच्या बॉयफ्रेन्डसहीत दोन लोकांना ताब्यात घेण्यात आलं. तेच मृत तरूणीच्या कुटुंबियांची रडून रडून हालत खराब झाली आहे. तरूणीच्या वडिलांनी तिच्यावर रेप झाल्याचाही आरोप लावला आहे आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराजच्या फूलपूरमध्ये राहणारी १८ वर्षीय तरूणी सलोरी भागात एका गर्ल्स होस्टेलमध्ये राहत होती आणि ईश्वर शरण कॉलेजमध्ये बीएचं शिक्षण घेत होती. त्याच कॉलेजमध्ये तिच्यासोब आझमगढचा राहणारा अमन सिंहही शिकत होता. तोही सलोरीमध्ये भाड्याच्या रूममध्ये राहत होता आणि त्याची तरूणीसोबत चांगली मैत्रीण होती.

दोन दिवसांआधी तरूणी अचानक गायब झाली होती. ज्यानंतर कुटुंबियांनी तिचा शोध घेणं सुरू केला होता. त्यांनी नंतर कर्नलगंज पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनीही चौकशी सरू केली. तेव्हा त्यांनी अम सिंह नावाच्या तरूणाची चौकशी केली.

बॉयफ्रेन्डने कबूल केला गुन्हा

अमन जास्त वेळ पोलिसांपासून सत्य लपवून ठेवू शकला नाही आणि त्याने तरूणीची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला. आरोपी अमनने सांगितलं, त्याने तरूणीला विहिरीत फेकलं होतं. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री उशीरा तिचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. याप्रकरणी तरूणीच्या बॉयफ्रेन्डसह आणखी एकाला अटक केली. सध्या पोलिसांनी तरूणीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे आणि आरोपींविरोधात कारवाई केली जात आहे.

हे पण वाचा :

चंगेज खानने कधीच भारतावर हल्ला का केला नाही? एक रोचक इतिहास
 

Web Title: Boyfriend murdered Girlfriend in Prayagraj Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.