मामी सोबत अफेयर, ब्रेकअप अन् षडयंत्र...भाच्यानं उचललं धक्कादायक पाऊल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 20:48 IST2023-04-01T20:47:43+5:302023-04-01T20:48:53+5:30
उत्तर प्रदेशच्या झांशीमध्ये लव्ह अफेयरचं एक वेगळंच प्रकरण उघडकीस आलं आहे.

मामी सोबत अफेयर, ब्रेकअप अन् षडयंत्र...भाच्यानं उचललं धक्कादायक पाऊल!
झांशी-
उत्तर प्रदेशच्या झांशीमध्ये लव्ह अफेयरचं एक वेगळंच प्रकरण उघडकीस आलं आहे. यात एका मुलानं आपल्या मामीला फसवण्यासाठी स्वत:च्याच किडनॅपिंगचं षडयंत्र रचलं. पण यात त्याला काही यश आलं नाही आणि तो पकडला गेला. याप्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर परिसरातील लोकांना धक्काच बसला आहे.
झांशीच्या प्रेमनगर परिसरातील ही घटना आहे. इथं राहणाऱ्या एका महिलेनं काही दिवसांपूर्वी एसएसपी कार्यालयात आपल्या मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली होती. गुंडांनी आपल्या मुलाला सोडवण्यासाठी १ लाख रुपये मागितल्याचा मेसेज केला असल्याचं म्हटलं. पैसे दिले नाही तर मुलाला ठार मारण्यात येईल अशी धमकी दिली गेली होती.
पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी केली. मग पोलिसांनाही मेसेज खंडणीचे मेसेज येऊ लागले. यानंतर पोलीस प्रशासनातही खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीनं शोध घेण्यास सुरुवात केली. यात प्रेमनगर पोलिसांनी झांशी-ललितपूर हायवेवर एका बसमधून फरार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या मातादीन याला पकडण्यात आलं आहे.
चौकशीत धक्कादायक माहिती उघड
पोलिसांनी केलेल्या चौकशीत जी माहिती समोर आली त्यात सर्वच अवाक् झाले. भाच्याचं स्वत:च्या मामीवरच प्रेम जडलं होतं. यामुळेच तो लग्नही करू मागत नव्हता. मामीसोबत त्याचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेम संबंध सुरू होते. पण काही महिन्यांपूर्वी मामीनं त्याच्यासोबत ब्रेकअप केलं आणि त्याच्यापासून लांब होण्यासाठीचे सगळे प्रयत्न केले.
धडा शिकवण्यासाठी केलं किडनॅपिंगचं प्लानिंग
दोघांमध्ये भांडणं सुरू झाली होती. यातच मामीनं तर थेट बलात्काराची तक्रार नोंदवली होती. यावरच नाराज होऊन धडा शिकवण्यासाठी मातादिन यानं स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला. यासाठी त्यानं मामीच्या भावाचा मोबाइल सिमकार्ड चोरी केलं आणि कुटुंबीय, नातेवाईक तसंच पोलिसांनाही मेसेज पाठवण्यास सुरुवात केली होती.
पोलिसांनी नंबर ट्रेस केला असता तो मातादिन याच्या मामीच्या भावाचा असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पोलिसांनी मोबाइलचं लाइव्ह लोकेशन ट्रेस केलं आणि मातादिन याला पकडलं.