मुलाची शाैचालयाच्या लोखंडी चॅनल गेटला उपरण्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 17:57 IST2022-07-20T17:56:03+5:302022-07-20T17:57:10+5:30
Suicide Case : रामचंद्र उर्फ निशांत नारायण कोनाळे असे मयत मुलाचे नाव आहे.

मुलाची शाैचालयाच्या लोखंडी चॅनल गेटला उपरण्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या
अहमदपूर (जि. लातूर) : शहरातील एका शाैचालयाच्या लोखंडी चॅनल गेटला उपरणाने गळफास घेऊन एका १९ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघड झाली. रामचंद्र उर्फ निशांत नारायण कोनाळे असे मयत मुलाचे नाव आहे.
पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर शहरातील नंदवन काॅलनीत वास्तव्याला असलेल्या रामचंद्र उर्फ निशांत नारायण काेनाळे (रा. थोट सावरगाव ता. अहमदपूर) हा १९ जुलै राेजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास मित्राला भेटून येतो, असे सांगून घरातून निघून बाहेर पडला. दरम्यान, बुधवार, २० जुलै रोजी सकाळी ७ वाजण्यापूर्वी महात्मा गांधी महाविद्यालय परिसरात असलेल्या शाैचालयाच्या लोखंडी चॅनल गेटला उपरण्याच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समाेर आले, अशी माहिती मयत मुलाचे काका मन्मथ ईश्वर कोनाळे यांनी पोलिसांना दिली आहे.