शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आईलाच आपल्या मुलाविरुद्ध फिर्याद देण्याची आली वेळ ; दारुच्या व्यसनापायी घरातच केली चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 16:37 IST

गेले काही वर्षे मुलाच्या या व्यसनापायी त्रासलेल्या या मातेने शेवटी पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला.

पुणे : कामधंदा काही न करणार्‍या मुलाने दारुच्या व्यसनापायी आपल्या आईचेच दागिने चोरल्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. राजेंद्र शिरीष देवकर (वय ३२, रा़ वैष्णवी हाईटस, होलेवस्ती, उंड्री) असेया मुलाचे नाव आहे़ याप्रकरणी त्याच्या ५२ वर्षाच्या आईला आपल्या मुलाविरुद्ध फिर्याद देण्याची वेळ आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आपल्या दोन मुलांसह उंड्रीत राहतात. राजेंद्र हा मोठा मुलगा असून तो काही एक कामधंदा करत नाही. त्याला दारुचे व्यसन असून सतत मित्रांसोबत फिरत असतो. त्यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी करतो. पैसे दिले नाही तर त्यांच्याबरोबर आणिआपल्या लहान भावाबरोबर भांडणे करत असतो. फिर्यादी या ५ जून रोजी आपल्या धाकट्या मुलासह धानोरीला नातेवाईकांकडे गेल्या होत्या. जाताना त्यांनी घरातील बेडरुममधील लाकडी कपाटात दागिने ठेवले होते. त्यावेळी राजेंद्र हा एकटाच घरी होता. सायंकाळी ५ वाजता त्या परत आल्या. त्यांनी कपाटात पाहिले तर त्यात सोन्याचे दागिने आढळून आले नाहीत. त्यात ३ तोळ्याचा सोन्याचा शाही हार, २ तोळ्यांचा राणी हार, ७ ग्रॅमची सोन्याची कानातील वेल असा ८५ हजार रुपयांचा ऐवज होता.त्यांनी त्याबाबत राजेंद्र याला विचारल्यावर त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. धाकट्या मुलानेही दागिन्याविषयी विचारल्यावर त्यालाही उडवाउडवीची उत्तरे देऊन तो घरातून निघून गेला. त्यानंतर फिर्यादी यांनी राजेंद्रची बॅग तपासली़. त्या बॅगेत त्यांना पायातील चांदीच्या पट्ट्यासापडल्या. तेव्हा राजेंद्रनेच दागिने चोरल्याची त्यांची खात्री झाली.गेले काही वर्षे मुलाच्या या व्यसनापायी त्रासलेल्या या मातेने शेवटी पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला.कोंढवा पोलिसांनी राजेंद्र देवकर याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाThiefचोरtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस