आईलाच आपल्या मुलाविरुद्ध फिर्याद देण्याची आली वेळ ; दारुच्या व्यसनापायी घरातच केली चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 04:36 PM2020-06-08T16:36:08+5:302020-06-08T16:37:02+5:30

गेले काही वर्षे मुलाच्या या व्यसनापायी त्रासलेल्या या मातेने शेवटी पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला.

A boy addicted to alcohol committed theft at home; mother registred complaint in police station | आईलाच आपल्या मुलाविरुद्ध फिर्याद देण्याची आली वेळ ; दारुच्या व्यसनापायी घरातच केली चोरी

आईलाच आपल्या मुलाविरुद्ध फिर्याद देण्याची आली वेळ ; दारुच्या व्यसनापायी घरातच केली चोरी

Next

पुणे : कामधंदा काही न करणार्‍या मुलाने दारुच्या व्यसनापायी आपल्या आईचेच दागिने चोरल्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. राजेंद्र शिरीष देवकर (वय ३२, रा़ वैष्णवी हाईटस, होलेवस्ती, उंड्री) असेया मुलाचे नाव आहे़ याप्रकरणी त्याच्या ५२ वर्षाच्या आईला आपल्या मुलाविरुद्ध फिर्याद देण्याची वेळ आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आपल्या दोन मुलांसह उंड्रीत राहतात. राजेंद्र हा मोठा मुलगा असून तो काही एक कामधंदा करत नाही. त्याला दारुचे व्यसन असून सतत मित्रांसोबत फिरत असतो. त्यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी करतो. पैसे दिले नाही तर त्यांच्याबरोबर आणिआपल्या लहान भावाबरोबर भांडणे करत असतो. फिर्यादी या ५ जून रोजी आपल्या धाकट्या मुलासह धानोरीला नातेवाईकांकडे गेल्या होत्या. जाताना त्यांनी घरातील बेडरुममधील लाकडी कपाटात दागिने ठेवले होते. त्यावेळी राजेंद्र हा एकटाच घरी होता. सायंकाळी ५ वाजता त्या परत आल्या. त्यांनी कपाटात पाहिले तर त्यात सोन्याचे दागिने आढळून आले नाहीत. त्यात ३ तोळ्याचा सोन्याचा शाही हार, २ तोळ्यांचा राणी हार, ७ ग्रॅमची सोन्याची कानातील वेल असा ८५ हजार रुपयांचा ऐवज होता.त्यांनी त्याबाबत राजेंद्र याला विचारल्यावर त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. धाकट्या मुलानेही दागिन्याविषयी विचारल्यावर त्यालाही उडवाउडवीची उत्तरे देऊन तो घरातून निघून गेला. त्यानंतर फिर्यादी यांनी राजेंद्रची बॅग तपासली़. त्या बॅगेत त्यांना पायातील चांदीच्या पट्ट्यासापडल्या. तेव्हा राजेंद्रनेच दागिने चोरल्याची त्यांची खात्री झाली.
गेले काही वर्षे मुलाच्या या व्यसनापायी त्रासलेल्या या मातेने शेवटी पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला.कोंढवा पोलिसांनी राजेंद्र देवकर याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे अधिक तपास करीत आहेत.
 

Web Title: A boy addicted to alcohol committed theft at home; mother registred complaint in police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.