शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
3
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
4
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
5
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
6
"बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत", स्वाती मालीवाल यांचा AAP वर गंभीर आरोप
7
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
8
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
9
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
10
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
11
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
12
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
13
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
14
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
15
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
16
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
17
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
18
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
19
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
20
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण

९० लाखांना घर खरेदी केली, २० फूट भुयार खोदून ४०० किलो चांदी लांबवली; फिल्मस्टाइल चोरीने पोलीसही चकीत

By बाळकृष्ण परब | Published: February 27, 2021 9:23 AM

Crime News : चोरी करण्यासाठी चोरट्यांकडून नेहमी नवनव्या क्लुप्त्या लढवल्या जात असतात. कधीकधी काही चोरटे फिल्मस्टाइल चोऱ्या करून लोकांना आणि पोलिसांनाही धक्का देतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जयपूर - चोरी करण्यासाठी चोरट्यांकडून नेहमी नवनव्या क्लुप्त्या लढवल्या जात असतात. कधीकधी काही चोरटे फिल्मस्टाइल चोऱ्या करून लोकांना आणि पोलिसांनाही धक्का देतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Crime News) राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये ही चोरीची घटना घडली असून, येथे चोरट्यांनी ९० लाख रुपयांना एक घर खरेदी करून त्या घरातून दुसऱ्या घरापर्यंत २० फूट लांब भुयार खणून तब्बल ४०० किलो चांदी लांबवल्याचे उघड झाले आहे. (Bought a house for 90 lakhs, dug a 20 feet tunnel and stole 400 kg of silver in Jaipur ) याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहरातील प्रसिद्ध हेअरप्लांट तज्ज्ञ डॉक्टर सुनीत सोनी यांच्या घरामध्ये चोरट्यांनी हा डल्ला मारला आहे. चोरांनी बेसमेंटमध्ये तीन बॉक्समध्ये लपवून ठेवलेली कोट्यवधीची चांदी लंपास केली. चोरी करण्यासाठी चोरट्यांनी आधी डॉक्टरांच्या बंगल्याच्या मागील एक घर ९० लाख रुपयांना खरेदी केली. त्यानंतर या घरातून बंगल्यापर्यंत २० फूट लांब भुयार खोदत चोर डॉक्टरांच्या घराच्या बेसमेंटपर्यंत पोहोचले. त्यानंतर त्यांनी तेथे ठेवलेल्या चांदीवर डल्ला मारला. 

दोन दिवसांपूर्वी डॉक्टर सोनी यांनी बेसमेंटची पाहणी केली असता त्यांना चांदीचे बॉक्स गायब झाल्याचे दिसले. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. डॉक्टर दाम्पत्याने सुमारे तीन महिन्यांपूर्वी आपल्या घरातील बेसमेंटमध्ये जमिनीच्या खाली तीन बॉक्समध्ये चांदी भरून ते जमिनीत पुरले होते. मात्र याची माहिती चोरांना मिळाली होती. चोरट्यांनी बेसमेंटमध्ये पोहोचण्यासाठी जबरदस्त योजना आखली. बेसमेंटमध्ये पोहोचण्यासाठी चोरांनी डॉक्टरांच्या बंगल्यामागे असलेले घर खरेदी केले. त्यानंतर तिथून बोगदा खोदला.   

याबाबत अधिक माहिती देताना एसीपी रायसिंह बेनिवाल यांनी सांगितले की, या टोळीमध्ये दोन-तीन किंवा त्यापेक्षा अधिक लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तसेच डॉक्टरांचे निकटवर्तीयच चोरीच्या या घटनेत सहभागी असू शकतात. कारण घरातील बेसमेंटमध्ये चांदीचा बॉक्स आहे आणि तो कुठे ठेवला आहे हे त्यांनाच माहिती असू शकते. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. आता या प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानSilverचांदीPoliceपोलिस