Both committed suicide due to financial difficulties due to lockdown pda | लॉकडाऊनमध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीमुळे दोघांनी केली आत्महत्या

लॉकडाऊनमध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीमुळे दोघांनी केली आत्महत्या

ठळक मुद्देपोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. मुंबईहून परत आल्यानंतर त्यांच्याकडे रेशन वगैरे खरेदी करण्यासाठी पैसा नव्हता.

उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यात लॉकडाऊनदरम्यान आपापल्या घरी पोहोचलेल्या दोन परप्रांतीय कामगारांनी आर्थिक पेचप्रसंगाने आत्महत्या केली. मटौंध पोलिस स्टेशन भागात बुधवारी एक युवक झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर पैलानी  पोलिस ठाण्यात काम करणाऱ्या दुसऱ्या एका कामगाराने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. मृतांचे कुटुंबीय आणि गावातील लोक कामगारांच्या आत्महत्येचे कारण आर्थिक संकट हे देत आहेत.
 

पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. मटौंध पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक रामेंद्र तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस स्टेशन परिसरातील लोहरा गाव येथील सुरेश (वय 22) यांचा मृतदेह बुधवारी शेतात एका झाडाला लटकलेला आढळला.तो दिल्लीत लॉकडाऊनमध्ये अडकला होता आणि पाच दिवसांपूर्वी आपल्या गावी परत आला होता. मृत युवकाचे कुटुंबीय सांगतात की, दिल्लीहून परत आल्यानंतर सुरेशकडे पैसे खर्च करण्यासाठी नव्हते, त्यामुळे त्याने स्वत: ला फास लावून घेतला.

अशीच आणखी एक घटना पैलानी पोलिस स्टेशन परिसरातील सिंधन कलां गावची आहे. दहा दिवसांपूर्वी मुंबईहून परत आलेल्या परप्रांतीय कामगार मनोज (वय 20) याने बुधवारी घराच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारी राहणाऱ्या अभिलाषच्या मते, मनोज मुंबईतील एका खासगी कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. मात्र, लॉकडाऊननंतर त्यांची कंपनी बंद पडली. त्यानंतर तो गावी परतला. त्याचे आई - वडील  पूर्वी मरण पावले होते आणि तो अविवाहित होता. मुंबईहून परत आल्यानंतर त्यांच्याकडे रेशन वगैरे खरेदी करण्यासाठी पैसा नव्हता.
पैलानी पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक बलजीत सिंह यांनी सांगितले की, शवविच्छेदनानंतर ग्रामस्थांनी मृत प्रवासी मजूर मनोज यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्याच्या आत्महत्येचे कारण ग्रामस्थ आर्थिक संकट असल्याचे सांगत आहेत, याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

 

एकतर्फी प्रेमातून युवकाने भावाच्या मेहुणीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून केली हत्या

 

 

Lockdown : डोंगरी पोलिसांनी बनावट पास बनवण्याऱ्या टोळीचा केला पर्दाफाश

 

Web Title: Both committed suicide due to financial difficulties due to lockdown pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.