फटका गँगमधील एकाला बोरीवली रेल्वे पोलिसांनी केले जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 18:15 IST2019-06-28T18:13:05+5:302019-06-28T18:15:36+5:30
आरोपी दीपक भोडकर (२०) याला पोलिसांनी खाकीचा वचक दाखविला.

फटका गँगमधील एकाला बोरीवली रेल्वे पोलिसांनी केले जेरबंद
मुंबई - लोकलच्या दरवाजात उभे राहिलेल्या प्रवाशांच्या हातावर लोखंडी रॉडने फटका देऊन ट्रॅकवर मोबाइल पाडून चोरणाऱ्या फटका गँगमधील एकाला बोरीवली लोहमार्ग पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले.
मालाड ते चर्चगेट असा एक प्रवासी प्रवास करत असताना गोरेगाव येथून लोकल सुटली. संबंधित प्रवासी लोकलच्या दरवाजावर उभा होता. रेल्वे रूळ मार्गावरील सिग्नलजवळ हातात लोखंडी रॉड घेऊन एक अनोळखी इसम उभा होता. लोकलमधील प्रवाशाला हेरून त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडचा मार अनोळखी इसमाने दिला. यामध्ये प्रवासी चालत्या लोकलमधून पडला. अनोळखी इसमाने प्रवाशाच्या खिशातील २१ हजार रुपयांचा मोबाइल चोरून पळ काढला.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटली. त्यानंतर आरोपी गोरेगाव येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संशयित आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. आरोपी दीपक भोडकर (२०) याला पोलिसांनी खाकीचा वचक दाखविला.