शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

बाप्पाच्या निरोपासाठी राज्यात कडेकोट बंदोबस्त; विसर्जन ठिकाणी ड्रोनद्वारे ‘वॉच’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 8:12 PM

संपूर्ण महाराष्ट्रात दोन लाख तर मुंबईत ५० हजार पोलीस रस्त्यावर

ठळक मुद्देमुंबईतील चौपाट्या व विसर्जन मिरवणूकीवर ड्रोनद्वारे प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. विविध चौपाटी व महत्वाच्या विसर्जनाच्या ठिकाणी सूचना फलक, प्रथमोपचार व नागरीक सुविधा केंद्र आणि वॉच टॉवर्स उभारण्यात आले आहेत.

मुंबई - उद्या अनंत चतुर्दशीदिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्यातील अकरा कोटीचा जनसमुदाय सज्ज झाला असताना या विसर्जनाच्या उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दल सज्ज झाले आहे. बाप्पांचे विर्सजन कोणतेही विघ्न न येता सुरळीतपणे पार पडावे म्हणून पूर्ण राज्यभरात दोन लाखावर तर राज्याची राजधानी मुंबईत ५० हजारावर पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे. गुरुवारी सकाळपासून मिरवणूक मार्ग व विसर्जनाच्या ठिकाणी पोलीस सज्ज राहणार आहेत. मुंबईतील चौपाट्या व विसर्जन मिरवणूकीवर ड्रोनद्वारे प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे.पोलिसांच्या मदतीला अन्य सुरक्षा यंत्रणा आणि होमगार्डही नेमण्यात आला असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना विश्वास ठेवू नये, संशयास्पद व्यक्ती व वस्तूबाबत तात्काळ पोलिसांना कळवून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी केले आहे. काश्मीरमधील ३७० कलम हटविण्यात आल्यानंतर त्याला अतिरेकी संघटनांनी विरोध केला आहे, त्यांच्याकडून गर्दीच्या ठिकाणी घातपाती कृत्य होण्याच्या शक्यतेने पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. गणपती विसर्जन मिरवणूकीवर विशेष खबरदारी बाळगण्यात आली आहे.गेल्या दहा दिवसांपासून बाप्पाच्या जल्लोषात मग्न असलेले भाविक आता त्याला निरोप देण्यासाठी सज्ज आहेत, विसर्जन मिरवणूक सुरळीतपणे पार पाडावी, यासाठी योग्य त्या सर्व दक्षता घेण्याचे आदेश सर्व पोलीस आयुक्त व अधीक्षकांना महासंचालक जयस्वाल यांनी दिल्या आहेत.मुंबईतील महत्वाची,गर्दीची ठिकाणी तसेच मिरवणूक मार्ग व चौपाटीच्या ठिकाणी पाच हजारावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेली आहेत. महिला व लहान मुलांच्या संरक्षणाच्या दृष्टिने विशेष पथके बनविण्यात आलेली आहेत. साध्या वेषात पाळत ठेवत राहणार आहे, हरविलेल्या मुलांसाठी , व्यक्तीसाठी ठिकठिकाणी मदत केंद्र बनविण्यात आली आहेत. त्याबाबत दक्षता घेण्यासाठी मेगाफोनद्वारे सातत्याने उदघोषण केली जाणार आहे. तसेच विविध चौपाटी व महत्वाच्या विसर्जनाच्या ठिकाणी सूचना फलक, प्रथमोपचार व नागरीक सुविधा केंद्र आणि वॉच टॉवर्स उभारण्यात आले आहेत.विर्सजनाच्या ठिकाणी ड्रोनद्वारे वॉचश्री च्या विसर्जन सोहळा पाहण्यासाठी महानगरातील सर्व चौपाट्यांवर भाविक मोठी गर्दी करतात, याठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी या परिसरावर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. संशयास्पद व्यक्तीच्या हालचाली, वस्तूवर नजर ठेवली जाईल. तसेच विसर्जनाच्या ठिकाणी जलतरणपटू,तटरक्षकासह बोटी व लॉचेस तयार ठेवण्यात आल्या आहेत.वाहतुकीच्या मार्गात बदलमहानगरातील विसर्जन मिरवणूकीमुळे शहर व उपनगरातील वाहतुक मार्गात तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आली आहे. ५६ ठिकाणे वाहनांसाठी बंद तसेच ५३ जागी दुहेरी मार्ग बंद करुन एकेरी बनविण्यात आले आहेत. त्याशिवाय १८ ठिकाणी अवजड वाहनांना बंदी आणि ९९ ठिकाणी नो पार्किंग क्षेत्र घोषित केले आहे. त्याबाबत वाहतुक नियंत्रण शाखेकडून विशेष बंदोबस्त नेमण्यात आला आहे.भाविकांसाठी हेल्प लाईनविर्सजन मिरवणूकीत कोणतीही अत्यावश्यक सेवा किंवा मदत हवी असल्यास भाविकांनी पोलीस नियंत्रण कक्षाबरोबरच ट्विटर, एसएमएसद्वारे ७७३८१३३१३३, ७७३८१४४१४४ याठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईGanpati Festivalगणेशोत्सव